यिर्मया 32:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
8 मग, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे माझ्या काकाचा मुलगा हानामेल, पहारेकऱ्यांच्या चौकात माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, बन्यामीन देशातल्या अनाथोथात जे माझे शेत आहे ते तू विकत घे. कारण वतन करून घेण्याचा व ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा अधिकार तुझा आहे. ते आपणासाठी विकत घे. तेव्हा मला कळले की हे परमेश्वराचे वचन आहे.
8 तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल माझ्याकडे पहारेकर्यांच्या चौकात आला; तो मला म्हणाला, ‘बन्यामिनाच्या प्रांतातील अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते वतन करून घेण्याचा व सोडवण्याचा हक्क तुझा आहे; तू ते आपल्यासाठी विकत घे.’ तेव्हा मी समजलो की हे परमेश्वराकडचे वचन आहे.
8 “याहवेहने म्हटल्याप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल आला व त्याने तुरुंगात माझी भेट घेतली. तो मला म्हणाला, ‘बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील माझे शेत विकत घे, कारण कायद्याप्रमाणे ते सोडवून त्याची मालकी घेण्याचा प्रथम हक्क तुझा आहे, म्हणून ते तुझ्यासाठी तू विकत घे.’ “तत्काळ माझी खात्री झाली की हा संदेश खरोखर याहवेहकडून आला होता;
मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्या घरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडिल दावीदाबरोबर मार्गक्रमण करतांना परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू दाविदाला साथ दिली आहेस”
पाहा, तुझा काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल तुझ्याकडे येईल आणि म्हणेल जे माझे शेत अनाथोथात आहे ते तू आपल्यासाठी विकत घे, कारण ते खरेदी करण्याचा अधिकार तुझा आहे.
म्हणून मी हे केले, जसे तू मला बजावले, दिवसा ढवळ्या मी सर्व वस्तू बाहेर हद्दपार आणल्या, आणि सायंकाळी आपल्या हातांनी वेशीला भगदड पाडले. मी माझ्या सर्व वस्तू अंधारात बाहेर काढल्या आणि त्यांच्या डोळ्यांदेखत सर्व आपल्या खांद्यावर घेऊन आलो.
यावरुन ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे पित्याने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.