यिर्मया 32:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण तू आपले लोक इस्राएलांना चिन्ह आणि चमत्कारांनी, आपला सामर्थ्यवान हाताने, बाहू उभारून आणि मोठ्या दहशतीने मिसरामधून बाहेर आणलेस. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तू चिन्हे व अद्भुत कृत्ये दाखवून समर्थ हाताने व बाहू उभारून मोठी दहशत घालून आपले लोक इस्राएल ह्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 चिन्ह व चमत्कारांनी आणि सशक्त बाहूंनी व विस्तारलेल्या भुजांनी, तसेच मोठी दहशत बसवून तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले. Faic an caibideil |
आणि तुझ्या इस्राएल लोकांसारखे दुसरे कोठले राष्ट्र पृथ्वीवर आहे ज्यांना तू, आपलेच लोक व्हावेत, म्हणून देव स्वतः त्यांना मिसरातून सोडवण्यास गेला; या तुझ्या लोकांस तू मिसरातून सोडवले तिच्या देखत महान व भयानक कृत्ये करून तू आपले नाव केले. ज्यांना तू मिसरातून सोडवले होते, त्या तुझ्या लोकांपुढून इतर राष्ट्रांस घालवून दिले.
दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या देवाने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने मिसर देशात तुमच्यासाठी महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले, त्याने तुमच्यासाठी संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेला भूज ह्याद्ववारे भयप्रद कार्ये केली.