Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 32:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यावेळी, बाबेलाच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा घातला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजाच्या घरात पहाऱ्यांच्या चौकात कैद होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्या समयी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमेस वेढा दिला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजगृहातील पहारेकर्‍यांच्या चौकात बंदीमध्ये होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 यावेळी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातलेला होता, व यिर्मयाह संदेष्टा यहूदीयाच्या राजवाड्याच्या तळघरातील कोठडीत कैदेत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 32:2
15 Iomraidhean Croise  

सिद्कीयाने बाबेलाच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरूशलेमेवर चाल करून गेला. सिद्कीयाच्या कारकिर्दीचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा देऊन लोकांचे येणे जाणे रोखले. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले.


उजई याचा पुत्र पलाल याने बुरजालगतच्या भिंतीच्या वळणापासूनची दुरुस्ती केली. हा बुरुज राजाच्या वरच्या घराजवळ होता. म्हणजेच राजाच्या पहारेकऱ्यांच्या चौकालगत होता. त्यानंतर परोशाचा पुत्र पदाय याने दुरुस्ती केली.


तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात. त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे; मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही.


यहूदाचा राजा सिद्कीया याने त्यास कैद केले होते आणि म्हणाला, तू का भविष्य करतो व म्हणतो परमेश्वर असे म्हणतो, पाहा, हे नगर मी बाबेलाच्या राजाच्या हाती देईन आणि तो ते घेईल.


मग, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे माझ्या काकाचा मुलगा हानामेल, पहारेकऱ्यांच्या चौकात माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, बन्यामीन देशातल्या अनाथोथात जे माझे शेत आहे ते तू विकत घे. कारण वतन करून घेण्याचा व ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा अधिकार तुझा आहे. ते आपणासाठी विकत घे. तेव्हा मला कळले की हे परमेश्वराचे वचन आहे.


नंतर यिर्मया पहारेकऱ्यांच्या अंगणात अजूनही बंदीस्त असता त्याच्याकडे दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,


परमेश्वरापासून यिर्मयाकडे वचन आले. नबुखद्नेस्सर बाबेलाचा राजा व त्याचे सर्व सैन्य व त्याच्या सत्तेखाली असलेली पृथ्वीवरील सर्व राज्ये व सर्व लोक यरूशलेमेशी व त्याच्या सर्व नगरांशी लढत होते तेव्हा हे वचन आले. ते या प्रमाणे,


पुढे यिर्मयाने बारूखाला आज्ञा दिली. तो म्हणाला, “मला मनाई आहे आणि मी परमेश्वराच्या घरात जाऊ शकत नाही.


ते अधिकारी यिर्मयावर रागावले. त्यांनी त्यास मारले आणि त्यास बंदिशाळेत ठेवले, जे योनाथान लेखक याचे घरच होते, कारण ते त्यांनी बंदिशाळेत बदलेले होते.


म्हणून सिद्कीया राजाने हुकूम दिला. त्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणात ठेवले. नगरातील सर्व भाकर संपेपर्यंत त्यास रस्त्यावरील रोटीवाल्याकडून भाकर द्यावी. अशा रीतीने यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात राहिला.


आता यिर्मया लोकांमध्ये येत व जात होता, कारण आतापर्यंत त्यास बंदिशाळेत टाकले नव्हते.


नंतर त्यांनी यिर्मयाला दोरांनी ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले. मग यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला.


मग त्यांनी यिर्मयाला घेतले आणि राजाचा मुलगा मल्कीया याच्या पाण्याच्या टाकीत टाकले. पाण्याची टाकी पहारेकऱ्यांच्या चौकात होती. त्यांनी यिर्मयाला दोरीने खाली सोडले. कैदखानेत पाणी नव्हते पण चिखल होता आणि तो त्या चिखलात रुतला.


आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan