Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वर असे म्हणतो, म्हणून तू याकोबा, माझ्या सेवका, घाबरु नकोस, आणि इस्राएला, हिंमत खचू नको. कारण पाहा, मी तुला दूर स्थानातून परत आणीन आणि तुझ्या वंशजांना बंदिवासाच्या देशातून तारीन. याकोब पुन्हा येईल आणि शांती असेल; तो सुरक्षित राहील आणि तेथे कोणी दहशत घालणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; कारण पाहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन. याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल; त्याला कोणी धाक घालणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “ ‘म्हणून भिऊ नको! याकोबा, माझ्या सेवका; हे इस्राएला, निराश होऊ नको,’ याहवेह असे जाहीर करतात. ‘मी तुला निश्चितच दूरच्या देशातून, व तुझ्या वंशजांना त्यांच्या बंदिवासातून वाचवेन. याकोबाला परत शांती व संरक्षण लाभेल आणि त्यांना कोणीही भयभीत करणार नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:10
40 Iomraidhean Croise  

या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.”


त्या दिवशी तुझ्या दुःखापासून आणि यातनेपासून आणि तुजवर लादलेले कठीण दास्यापासून परमेश्वर तुला विसावा देईल,


तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत, परंतु तेथे उद्धारलेले चालतील.


घाबरू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी पूर्वेपासून तुझी संतती आणीन, आणि पश्चिमेकडून तुला एकत्र गोळा करीन.


तर आता याकोबा, माझ्या सेवका आणि इस्राएला, ज्या तुला मी निवडले आहे तो तू माझे ऐक.


ज्याने तुला निर्माण केले आणि गर्भस्थानापासून तुला घडिले, जो तुझे साहाय्य करतो तो परमेश्वर असे म्हणतो, हे याकोबा, माझ्या सेवका, आणि यशुरुना, ज्या तुला मी निवडले आहे तो तू भिऊ नको.


मी पूर्वेककडून एका हिंस्त्र पक्षाला, माझ्या निवडीचा मनुष्य दूरच्या देशातून बोलावतो; होय, मी बोललो आहे; ते मी पूर्णही करीन; माझा उद्देश आहे, मी तोसुध्दा पूर्ण करीन.


मी आपला न्याय जवळ आणत आहे; तो फार दूर नाही आणि माझे तारण थांबणार नाही; आणि मी सियोनाला तारण देईन आणि माझी शोभा इस्राएलास देईन.


“पाहा! दूरदूरच्या ठिकाणाहून ते माझ्याकडे येत आहेत उत्तर आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत. काही सीनी येत आहेत.”


पण परमेश्वर असे म्हणतो, होय, बंदिवान योद्धांकडून काढून घेण्यात येतील, आणि लूटलेले सोडवले जातील. कारण मी तुझ्या शत्रूंचा विरोध करीन, आणि तुझ्या मुलांना वाचविल.


घाबरू नकोस कारण तू लज्जित होणार नाहीस किंवा निराश होऊ नको कारण तू कलंकीत होणार नाहीस; तू आपल्या तरुणपणाची लाज आणि आपल्या त्यागण्याची बदनामी विसरशील.


“मी स्वत: माझ्या उरलेल्या कळपास ज्या सर्व देशात घालवला होता, त्यास एकत्र करणार, आणि त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन. मग ती सफल होऊन बहूतपट होतील.


मग मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, जो त्यांना पाळील, म्हणजे ती घाबरणार नाहीत व भयभीत होणार नाहीत. त्यातील एकही हरवणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो.


त्याच्या दिवसात यहूदा तरला जाईल, आणि इस्राएल सुरक्षित राहील. आणि ज्या नावाने त्यास हाक मारतील ते हे, म्हणजे परमेश्वर आमचे न्यायीपण असे असेल.


उलट ते असे म्हणतील, परमेश्वर जिवंत आहे, ज्याने इस्राएलाच्या वंशांना उत्तरेकडील देशातून आणि सर्व देशात ज्यात त्यांना घालवले होते, त्यातून बाहेर काढून वर चालवून आणले, असे म्हणतील.


कारण परमेश्वर असे म्हणतो की, तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या योजना आहेत त्या मी जाणतो; त्या योजना तुमच्या हिताच्या आहेत आणि अनिष्टासाठी नाहीत, त्या तुम्हास भविष्य व आशा देणाऱ्या आहेत.


परमेश्वर असे म्हणतो की मग मी तुम्हास प्राप्त होईल. “मी तुम्हास बंदिवासातून परत आणीन आणि ज्या सर्व राष्ट्रांत व सर्व स्थानात मी तुम्हास विखरविले त्यातून मी तुम्हास एकवटीन आणि ज्या स्थानातून मी तुम्हास कैद करून नेले आहे त्याकडे मी तुम्हास परत आणीन.” असे परमेश्वर म्हणतो.


त्या दिवसात यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्यासोबत चालेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील व मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.


कारण पाहा, परमेश्वराचे हे निवेदन आहे, असे दिवस येतील की, ज्यात मी आपल्या लोकांचे इस्राएल आणि यहूदा यांचे भविष्य प्रस्थापित करील. कारण मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशात त्यांना परत आणीन आणि ते त्याचा ताबा घेतील.” असे मी परमेश्वर म्हणत आहे.


हायहाय! तो दिवस महान आहे, त्याच्यासारखा कोणताही नाही. तो याकोबासाठी चिंतेचा समय आहे, पण त्यातून त्यांचे रक्षण होईल.


त्या दिवसात यहूदाचे तारण होईल आणि यरूशलेम सुरक्षित राहील. कारण तिला परमेश्वर आमची धार्मिकता आहे या नावाने बोलवतील.


विशेषत; तू आपली स्वतःची लाज दाखवलीस; या मार्गाने तू आपल्या बहीणीपेक्षा उत्तम आहेस हे दर्शविले, तू केलेल्या पापाने सर्व किळसवाणे कार्य तू केलेले आहेस, तुझी बहीण तुझ्याहून उत्तम आहे, विशेषत; तू आपली लाज उघडी केली, या मानाने तुझी बहीण तुझ्या मानाने उत्तम आहे.


मग तू म्हणशील, मी उघड्या देशापर्यंत जाईन; ज्या देशांच्या नगराला तटबंदी नाही त्यांच्यावर मी हल्ला करीन. ते लोक सुरक्षित शांतीने राहतात, ते सर्वजण जेथे कोठे राहतात तेथे भिंती, अडसर, वेशी नाहीत त्यावर मी चालून जाईन.


आणि मीखाएल जो मोठा अधिपती तुझ्या लोकांच्या संतानांसाठी उभा असतो तो त्या समयी उभा राहील; आणि राष्ट्र झाल्यापासून त्या वेळेपर्यंत कधी झाला नाही असा कष्टाचा समय होईल; आणि त्या वेळेस तुझे लोक सोडवले जातील, प्रत्येक जो पुस्तकात लिहिलेला सापडेल तो सोडवला जाईल.


त्या दिवशी मी इस्राएलासाठी वनपशु, आकाशातील पाखरे, भूमीवर रांगणारे ह्यांसोबत करार करीन. मी देशातून धनुष्य तलवार आणि लढाई नाहीशी करीन, व ते तेथे सुरक्षित वस्ती करतील.


मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन, व तू हे जाणशील की, मी परमेश्वर आहे.


तुझ्यासाठी यहूदा, हंगामाची वेळ येईल, तेव्हा मी माझ्या लोकांस बंदिवासापासून मुक्त करीन.


हे भूमी, घाबरू नकोस. आनंद कर आणि उल्हसित हो, कारण परमेश्वराने महान गोष्टी केल्या आहेत.


आता, तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस? काय तुझ्यात राजा नाही? काय तुझा सल्लागर नष्ट झाला आहे? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या कळा तुला लागल्या आहेत.


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात, प्रत्येक पुरुष आपल्या शेजाऱ्याला आपल्या अंजिराच्या झाडाखाली व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवील.”


‘हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’ या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan