Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 टेकड्यांवरून आणि पर्वतांवरून फक्त खोटेपणा येतो, खचित इस्राएलचे तारण हे परमेश्वर आपल्या देवाच्या ठायी आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 टेकड्यांवरील शब्द, डोंगरांवरील गडबड खोटी ठरली आहे; खरोखर आमचा देव परमेश्वर ह्याच्या ठायी इस्राएलाचे तारण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 निश्चितच डोंगरावरील गोंधळ व पर्वतावरील फसवणूक; निश्चितच आमचे परमेश्वर याहवेह हेच इस्राएलचे तारण आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:23
25 Iomraidhean Croise  

तारण परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला.


माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे; माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे.


लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात, पण तारण परमेश्वराकडून आहे.


त्या दिवशी, इस्राएलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, ज्यांनी त्यांना पराजीत केले त्यांचा आश्रय घेणार नाहीत, तर इस्राएलाचा जो पवित्र परमेश्वर याच्याकडे खरोखर येतील.


पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही, कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.”


मी, मीच परमेश्वर आहे आणि माझ्यावाचून कोणीही तारणारा नाही.


जे कोरीव मूर्ती घडवतात ते सर्व काहीच नाहीत; ज्या गोष्टीत ते आनंदीत होतात त्या कवडीमोलाच्या आहेत. त्यांचे साक्षी पाहू शकत नाही किंवा काहीच समजत नाही आणि ते लज्जित होतील.


हे इस्राएलाच्या देवा, तारणाऱ्या, खरोखर तू जो स्वतःला लपविणारा आहेस.


पण परमेश्वराकडून इस्राएल सर्वकाळच्या तारणाने तारला जाईल; तुम्ही पुन्हा कधीही लज्जित किंवा अपमानीत होणार नाही.


जे तुम्ही राष्ट्रातून निभावलेले शरणार्थी ते तुम्ही एकत्र जमा व्हा व या. जे कोरीव मूर्तीची लाकडे वाहून नेतात आणि ज्या देवाला तारण करता येत नाही त्याची प्रार्थना करतात त्यांना काही ज्ञान नाही.


जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे? जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे? जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे.


तू तर आमचा पिता आहेस, तरी अब्राहाम आम्हास ओळखत नाही आणि इस्राएलाला आम्ही माहीत नाही. परमेश्वरा, तू आमचा पिता, सर्वकाळपासून आम्हांला खंडून घेणारा, हे तुझे नाव आहे.


इस्राएलाची आशा, तोच एक ज्याने संकटकाळी त्यास तारले. तू देशात उपऱ्यासारखा किंवा जो वाटसरु रात्री उतरायला वळतो त्याच्यासारखा तू का असावा?


परमेश्वरा, तू मला बरे कर, आणि मी पूर्ण, बरा होईन. तू मला तार, म्हणजे मी तरेन. कारण तुच माझे स्तुतीचे गीत आहेस.


त्यांचे लोक उंच डोंगरावरील हिरव्या झाडाजवळील त्यांच्या वेद्या आणि अशेराचे खांब आठवण करतात.


नंतर योशीया राजाच्या दिवसात परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, इस्राएल माझ्या बाबतीत कसा अविश्वासू आहे, हे तू पाहिलेस का? एका व्यभिचारीणी प्रमाणे तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली व्यभिचार केला.


परमेश्वर असे म्हणतो, “याकोबासाठी आनंदाचा गजर करा! राष्ट्रांतील प्रमुख लोकांसाठी आनंदाने जयघोष करा! ऐकू येईल अशी स्तुती करा. म्हणा, ‘हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचे, इस्राएलाच्या वाचलेल्यांचे तारण कर.’


मी आपले हाथ उंचावून शपथ घेऊन दिलेल्या देशात मी त्यांना आणिले, तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी आणि दाट छायेचे वृक्ष पाहून मला संतापावण्यासाठी तेथे त्यांनी यज्ञबली अर्पिली. तेथे त्यांनी सुवासीक धुप जाळीला व पेयार्पण अर्पिली.


तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई, घोडे किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही तर त्यांना स्वबळाने सोडवेन.


तुम्ही ज्याला ओळखीत नाही अशाची उपासना करता; आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहूद्यांतूनच तारण आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan