Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मी म्हणालो, मी तुला लेकरांमध्ये कसे ठेवीन? आणि रमणीय देश, म्हणजे राष्ट्रांच्या सैन्याचे सुशोभित वतन, तुला कसे देईन? तेव्हा मी म्हटले तुम्ही मला माझ्या ‘पिता’ असे म्हणाल व मला अनुसरण्यापासून मागे फिरणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मी तुला पुत्राच्या योग्यतेस आणावे, तुला मनोरम भूमी द्यावी, राष्ट्रांतील श्रेष्ठ वैभवाचे वतन तुला द्यावे असे मला वाटले होते; तुम्ही मला, माझ्या बापा, असे म्हणाल, मला अनुसरायचे सोडून मागे फिरणार नाही असे मला वाटले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “मी स्वतःला म्हटले, “ ‘तुम्हाला माझ्या मुलाबाळांप्रमाणे वागवितांना मला किती आनंद होईल आणि मी तुम्हाला सुखद भूमी देईन, कोणत्याही देशापेक्षा अधिक सुंदर वतन.’ मला वाटले तू मला ‘पिता’ म्हणून हाक मारशील आणि माझे अनुसरण करण्यापासून मागे फिरणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:19
32 Iomraidhean Croise  

नंतर त्यानीं फलदायी देश तुच्छ मानला; त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही,


माझ्या करिता सिमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत. खचित माझे वतन सुंदर आहे.


तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस.


ज्ञानी सन्मानाचे वतनदार होतील, पण मूर्ख त्यांच्या लज्जेत वर उचलले जातील.


तू तर आमचा पिता आहेस, तरी अब्राहाम आम्हास ओळखत नाही आणि इस्राएलाला आम्ही माहीत नाही. परमेश्वरा, तू आमचा पिता, सर्वकाळपासून आम्हांला खंडून घेणारा, हे तुझे नाव आहे.


पण तरीही परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही मातीप्रमाणे आहोत आणि तू आमचा कुंभार आहेस. आम्ही सर्व तुझ्या हातांचे काम आहो.


पुष्कळ मेंढपाळांनी माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी माझा वाटा पायदळी तुडविला आहे, त्यांनी माझा आनंददायक भाग वैराण व वाळवंटात पालटवला आहे.


त्या वेळेला यरूशलेम बद्दल अशी घोषणा करतील, हे परमेश्वराचे सिंहासन आहे आणि परमेश्वराच्या नावाचा मान राखण्यासाठी सर्व राष्ट्रे यरूशलेममध्ये एकत्र येतील. या पुढे ते त्यांच्या दुराग्रही आणि दुष्ट मनांचे अनुसरण करणार नाहीत.


माझ्या बापा, मी तरूण असताना तुच माझा जवळचा मित्र आहेस. असे आतापासून तू मला म्हणणार नाही काय.


एफ्राईम माझे बहुमूल्य मुल नाही काय? तो माझा प्रिय मोहक मुलगा नाही का? कारण जरी कधी मी त्याच्याविरुध्द बोललो, तरी खचित मी त्यास आपल्या मनात प्रेमाने आठवण करीतच असतो. याप्रकारे माझे हृदय त्याच्यासाठी कळवळते. मी खरोखर त्याच्यावर दया करीन. असे परमेश्वर म्हणतो.


ते रडत येतील. ते विनंती करत असता मी त्यास नेईन, मी त्यांना सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाजवळ नेईन. ते त्यावर अडखळणार नाहीत. कारण मी इस्राएलाचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे.


कारण हे नगर पृथ्वीतल्या सर्व राष्ट्रांसमोर मला आंनदाचे नाव, स्तुतीचे गीत, सन्मानास कारण असे होईल. त्यांचे सर्व हित मी करीन ते ती ऐकतील आणि जे सर्व हित व जे सर्व कुशल मी त्यांना प्राप्त करून देईन त्यावरून ती भयभीत होतील व थरथर कापतील.


मी या लोकांस का क्षमा करावी? तुझ्या मुलांनी माझा त्याग केला आणि त्यांनी जे देव नाही त्यांच्या शपथा वाहिल्या. मी त्यांना भरपूर खाऊ घातले, परंतू त्यांनी व्यभिचार केला आणि वारांगनेच्या घराचा मार्ग पकडला.


त्या दिवशी मी आपले हात उंचावून त्यांच्याशी शपथ वाहीली की, मी त्यांना मिसर देशातून बाहेर आणिन आणि मी त्यांना खात्रीपूर्ण त्यांच्यासाठी निवडलेल्या देशात आणिन ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहे, तो देश सुंदर असून सर्व देशांचा मुकुट मणी आहे.


पण उत्तरेचा राजा मनात येईल तसे दक्षिणेच्या राजाशी करील त्यास कोणी थांबवू शकणार नाही, त्या सुंदर भूमीवर तो हाती नाश घेऊन उभा राहील.


तो वैभवी देशात येईल आणि अनेक लोक पडतील पण अनेकांचा त्याच्या हातून बचाव होईल अदोम, मवाब आणि अम्मोनाचे सरदार, हे त्याच्या हातून सुटतील.


तो आपला शाही तंबू समुद्राच्या आणि पवित्र पर्वताच्या दरम्यान ठोकील. तो त्याच्या शेवटास येईल. पण कोणी त्यास मदत करणार नाही.


त्यातल्या एकातून एक लहान शिंग निघाले मग ते दक्षिणेस पुर्वेस आणि इस्राएलास गौरवी प्रदेशात वाढत गेले.


हे एफ्राईमे, मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला, मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ? मी तुला अदमासारखे कसे करु? मी तुला सबोयिमासारखे कसे करु? माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे.


पण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे देवाचे पुत्र आहात.


देवाच्या प्रीतीप्रमाणे, येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली.


तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर अंगावर वार करून घेणे, मुंडण करणे असे करु नका.


परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही; तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत.


आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan