Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 3:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तुम्ही पाप केले आहे, तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या देवाच्या, विरूद्ध गेलात. प्रत्येक हिरव्या झाडाखाली तू अन्य दैवतांसोबत आपले मार्ग वाटून घेतले, आणि माझा शब्द ऐकला नाही, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तू आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून पतन पावून इकडे तिकडे प्रत्येक हिरव्या झाडाखालून परक्याबरोबर भटकलीस व माझा शब्द ऐकला नाहीस, हा आपला दोष मात्र पदरी घे, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 केवळ तुम्ही आपली पापे स्वीकार करा— तुमचे याहवेह परमेश्वर यांच्याविरुद्ध तुम्ही बंड केले आहे, इतर परकीय दैवतांची तुम्ही उपासना केली प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली, माझे आज्ञापालन केले नाही,’ ” असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 3:13
22 Iomraidhean Croise  

इस्राएली वंशजांनी स्वतःला परकीयांपासून वेगळे केले. ते उभे राहिले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या पापांची आणि आपल्या पूर्वजांच्या वाईट कृत्यांची कबुली दिली.


एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही, पण एखाद्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल.


तुम्ही प्रत्येक झाडा खाली, एला झाडांमध्ये मदोन्मत्त होता, तुम्ही जे सुकलेल्या नदीखोऱ्यांमध्ये, खडकांच्या कड्यांखाली मुले ठार मारता.


परमेश्वर या लोकांस असे म्हणतो: त्यांना भटकने प्रिय झाले आहे, त्यांनी आपले पाय असे करण्या पासून आवरून धरले नाही. यास्तव परमेश्वर त्यांच्यापासून आनंदी नाही, आता तो त्यांची दुष्कृत्ये लक्षात ठेवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा करील.


परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हास जाणीव आहे. आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याविरूद्ध अपराध केले.


“कारण फार वर्षांपूर्वी तुझे जोखड मोडले आणि तुझी बंधने तोडली. तरी तू म्हणालीस, ‘मी तुझी सेवा करणार नाही.’ तर प्रत्येक उंच टेकडीवरील अथवा प्रत्येक हिरव्या झाडाखालील तू व्यभिचारीणीप्रमाणे वाकलीस.


तू आपल्या पायांना अनवाणी होण्यापासून आणि तुझ्या गळ्याला तृषीत होण्यापासून आवरून धर. पण तू म्हणतेस, आशा नाही, नाही, मी परक्यांवर प्रीती केली आहे आणि मी त्यांच्या मागे जाईलच.


डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या वेश्या व्यवसायाने व दुष्टतेने राष्ट्र भ्रष्ट केले आहेस.


आम्ही आपल्या लज्जेत पडू. आमची लाज आम्हांला झाको, कारण आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध पाप केले. आम्ही आणि आमच्या वडिलांनी, आपल्या तरुणपणापासून या दिवसापर्यंत परमेश्वरा आमचा देव याचा शब्द ऐकला नाही.


नंतर योशीया राजाच्या दिवसात परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, इस्राएल माझ्या बाबतीत कसा अविश्वासू आहे, हे तू पाहिलेस का? एका व्यभिचारीणी प्रमाणे तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली व्यभिचार केला.


पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते त्यांच्या दुष्ट अंतःकरणाच्या, त्यांच्या स्वतःच्या हट्टी योजनांनुसार जगले. म्हणून ते पुढे येण्याऐवजी मागे गेले.


पण त्यांनी माझे ऐकले नाही, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपली मान ताठ केली. ते त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक दुष्ट होते


पण तू आपल्या देखणेपणावर विसंबून राहीली आणि वेश्या कर्म केले, ये जा करणाऱ्यांशी तू वेश्या कर्म केले, त्यांनी तुझे सोंदर्य लुटले.


मी आपल्या स्थानी परत जाईन, जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाहीत आणि माझे मुख शोधत नाहीत; जोपर्यंत ते आपल्या दु:खात कळकळीने माझा शोध घेऊन म्हणत नाहीत.


आता तेथे असलेल्या ज्या राष्ट्रांना तुम्ही ताब्यात घेणार आहात. त्यातले लोक ज्या ठिकाणी, उंच पर्वत, टेकड्यांवर, आणि हिरवीगार झाडी अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या देवाची उपासना करीत असतील त्या सर्वांचा तुम्ही अवश्य नाश करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan