Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 28:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या व बाबेलास कैद करून नेलेले यहूदाचे जे सर्व लोक यांस मी परत या ठिकाणी आणीन असे परमेश्वर म्हणतो, कारण मी बाबेलाच्या राजाचे जोखड मोडीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 यहूदाचा राजा यकन्या बिन यहोयाकीम व बाबेलास पकडून नेलेले यहूदाचे सर्व लोक ह्यांना मी ह्या ठिकाणी परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आणि यहोयाकीमचा पुत्र, यहूदीयाचा राजा यकोन्याह व खास्द्यांच्या देशात बंदिवासात पाठविलेले सर्व बंदी यांनाही मी परत आणेन. बाबेलच्या राजाचे जोखड मी तोडून टाकेन,’ असे याहवेह जाहीर करतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 28:4
20 Iomraidhean Croise  

तुझ्या तलवारीने तू जगशील व आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा तू बंड करशील, तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील.”


नबुखद्नेस्सरने यरूशलेमेमधील सगळी वडिलधारी मंडळी आणि धनवान लोक यांना कैद केले. दहाहजार लोकांस त्याने कैद केले. कुशल कामगार आणि कारागिर यांनाही त्याने पकडले. अगदी गरीबातला गरीब मनुष्य वगळता कोणालाही मोकळे ठेवले नाही.


कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा, त्याजवर जुलूम करणाऱ्याच्या काठीचा तू चुराडा केला आहे.


नेगेबमधील शहरे बंद केली गेली आहेत, ती उघडायला कोणी नाही. यहूदाला बंदिस्त केले आहे, तिच्यातील सर्व हद्दपार करण्यात आले आहेत.


“कारण फार वर्षांपूर्वी तुझे जोखड मोडले आणि तुझी बंधने तोडली. तरी तू म्हणालीस, ‘मी तुझी सेवा करणार नाही.’ तर प्रत्येक उंच टेकडीवरील अथवा प्रत्येक हिरव्या झाडाखालील तू व्यभिचारीणीप्रमाणे वाकलीस.


मेलेल्यां करिता रडू नको आणि शोक करू नको, परंतू जे कोणी पाडावपणात गेले आहेत त्याच्यासाठी रडा, कारण तो परतून त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.


“परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, यहोयाकीमचा, यहूदाच्या राजा, याचा मुलगा, कोन्या, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते.


परमेश्वराच्या मंदिरासमोर दोन अंजिराच्या टोपल्या व्यवस्थित मांडलेल्या मी पाहिल्या. (बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकोन्याला व यहूदाचे सरदार व कारागीर व लोहार कैद करून नेले, यरूशलेममधून बाबेलला नेले)


परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणाला, “या चांगल्या अंजीरासारखे यहूदा जे कैद करून नेलेले मी स्थानातून खास्द्यांच्या देशात त्यांच्या हितासाठी पाठवले आहे, त्यांच्याकडे मी पाहीन.


म्हणून जे राष्ट्रे आणि राज्ये बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराची सेवा करणार नाही आणि बाबेलाचा राजा याच्या जोखडाखाली आपली मान देणार नाही, त्यास मी त्याच्या हातून नाहीसे करीपर्यंत, तलवारीने, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करीन. असे परमेश्वर म्हणतो.


परंतु हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरून जोखड काढून व तोडून टाकले.


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, बाबेलाच्या राजाने लादलेले जोखड मी मोडले आहे.


बंदिवान करून नेलेल्यांतील राहिलेले वडील याजक, संदेष्टे आणि यरूशलेमेमधून बाबेलास ज्यास नबुखद्नेस्सराने कैद करून नेले होते, त्या सर्व लोकांस यिर्मया संदेष्ट्याने यरूशलेमेहून पत्र पाठवले.


राजा यकन्या, राजमाता, व उच्च अधिकारी, यहूदाचे व यरूशलेमेचे नेते, व कारागीर हे यरूशलेमेमधून निघून गेल्यावर यिर्मयाने हे पत्र पाठवले.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्या दिवशी असे होईल की, मी तुमच्या मानेवरील जोखड मोडीन आणि तुमची बंधने तोडीन, यापुढे परके तुला गुलाम करणार नाहीत.


मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हास मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हास पुन्हा ताठ चालवले आहे!


तर आता मी त्यांचे जोखड तुझ्यावरून मोडून काढीन व तुझी बंधने तोडून टाकीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan