Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 28:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग त्याच वर्षी असे झाले की, यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या सुरवातीला चौथ्या वर्षाच्या व पाचव्या महिन्यात अज्जूरचा मुलगा हनन्या संदेष्टा, जो गिबोनाकडचा होता, परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी याजक व सर्व लोकांसमोर माझ्याशी बोलला. तो म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नंतर असे झाले की त्याच वर्षी यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या आरंभी चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात गिबोनकर संदेष्टा हनन्या बिन अज्जूर ह्याने परमेश्वराच्या मंदिरात याजकांसमोर व सर्व लोकांसमोर मला असे सांगितले की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 त्याच वर्षी, म्हणजे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी म्हणजे चौथ्या वर्षातील पाचव्या महिन्यात, गिबोन येथील अज्जूरचा पुत्र हनन्याह नावाचा जो संदेष्टा होता, तो याजक व सर्व लोकांच्या समक्ष मला उद्देशून याहवेहच्या भवनात जाहीरपणे म्हणाला:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 28:1
22 Iomraidhean Croise  

राजा गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली.


सिद्कीया राज्य करु लागला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर अकरा वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्ना शहरातील यिर्मया याची मुलगी.


सिद्कीया यहूदाचा राजा झाला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये अकरा वर्षे राज्य केले.


नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय.


संदेष्ट्याला स्वप्न सांगायचे असेल, तर त्यास सांगू द्या. पण ज्या कोणाला मी काही घोषीत करतो, त्याने माझे वचन सत्याने सांगावे. गव्हा पुढे गवत ते काय? परमेश्वर असे म्हणतो.


यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम ह्याच्या राजाच्या आरंभी हे वचन परमेश्वरापासून यिर्मयाकडे आले. ते म्हणाले,


म्हणून मी यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याशी बोललो आणि त्यास हा संदेश दिला. “तुम्ही आपल्या माना बाबेलाच्या राजाच्या जोखडात द्या आणि त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा म्हणजे तुम्ही जगाल.


मग यरूशलेमेला, यहूदाचा राजा सिद्कीया याच्याकडे जे दूत येतात त्यांच्या हातून अदोमाच्या राजाकडे व मवाबाच्या राजाकडे, अम्मोन लोकांच्या राज्याकडे, सोराच्या राजाकडे, सीदोनाच्या राजाकडे ती पाठव.


मग हनन्या सर्व लोकांसमोर बोलला व म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘ह्याप्रमाणेच बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने लादलेले जोखड दोन वर्षाच्या आत मी प्रत्येक राष्ट्रांच्या मानेवरून काढून तोडून टाकीन.” मग यिर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला.


आणि त्याच वर्षाच्या सातव्या महिन्यात संदेष्टा हनन्या मेला.


जे याजक हनन्या संदेष्टाच्यासमोर होते आणि सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते, तेव्हा यिर्मया संदेष्टा बोलला,


“कारण तुम्ही म्हटले आहे की, परमेश्वराने आम्हासाठी बाबेलामध्ये संदेष्टे उत्पन्न केले आहेत.”


तो खाली राजाच्या घरात चिटणीसाच्या खोलीत गेला. तेव्हा पाहा, सर्व अधिकारी, लेखक अलीशामा, शमायाचा मुलगा दलाया, अखबोरचा मुलगा एलनाथान, शाफानाचा मुलगा गमऱ्या व हनन्याचा मुलगा सिद्कीया आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तेथे बसले होते.


तो जसा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहताच, तेथे पहारेकऱ्यांचा प्रमुख होता. तेव्हा हनन्याचा मुलगा शलेम्या याचा मुलगा इरीया त्याचे नाव होते. त्याने यिर्मया संदेष्ट्याला धरले व म्हणाला, “तू फितून खास्द्यांकडे जात आहेस.”


तुझे संदेष्टे कोठे आहेत, ज्यांनी तुला भविष्य सांगितले आणि म्हणाले बाबेलचा राजा तुम्हावर किंवा या देशाविरूद्ध येणार नाही?


यहूदाचा राजा सिद्कीया याच्या राज्याच्या सुरवातीच्या काळात एलामाविषयी यिर्मया संदेष्ट्याकडे परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,


महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा सारया हा जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर त्याच्या राज्याच्या चौथ्या वर्षी, बाबेलास गेला तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याने त्यास आज्ञापिले ते हे. कारण सराया हा प्रमुख अधिकारी होता.


लोकांस खोटा दृष्टांत आणि खोटे भाकीत कळले आहे, जो कोणी म्हणतो परमेश्वर देव अमुक तमुक जाहीर करीत आहे. परमेश्वर देवाने त्यांना पाठवले नसतांनाही त्यांनी लोकांस आशा दिली आहे, आणि त्यांनी दिलेला संदेश खरा ठरेल.


ते आपल्या वाईटाने राजाला, आणि लबाडीने अधिकाऱ्याला खूश करतात.


परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा देवाशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो.”


यहोशवाने यरीहो आणि आय या नगरांचे काय केले हे जेव्हा गिबोनाच्या रहिवाश्यांनी ऐकले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan