Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 26:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा सर्व यहूदातील नगरांना तुला त्यांच्याजवळ बोलायला आज्ञापितो ती बोल, एक शब्द कमी करु नको.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “परमेश्वर म्हणतो : परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहा, व यहूदाच्या सर्व नगरांतून जे परमेश्वराच्या मंदिरात भजनपूजन करण्यास येतात त्यांना जे शब्द बोलण्याची मी तुला आज्ञा केली आहे ते सर्व त्यांना सांग, एकही शब्द गाळू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेह असे म्हणतात, “यहूदीया प्रांताच्या विविध नगरातून लोक उपासना करावयास आले आहेत, तेव्हा तू याहवेहच्या मंदिरासमोर उभा राहा आणि यहूदीया नगरातील सर्व लोकांना जे याहवेहच्या मंदिरात उपासना करण्यास आले त्यांच्याशी बोल. मी तुला सांगितलेले सर्व त्यांना सांग; त्यातील एकही शब्द कमी करू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 26:2
32 Iomraidhean Croise  

यास्तव, तू स्वत:ला तयार कर, उभा राहा आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते त्यांना सांग, त्यांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर मी तुला त्यांच्यासमोर भयभीत करेन.


पण परमेश्वर मला म्हणाला, “मी लहान बालक आहे असे म्हणू नकोस. मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे, आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील.


मग परमेश्वराने यिर्मयाला ज्या जागी भविष्य देण्यास सांगितले होते ती जागा म्हणजे तोफेत यिर्मयाने सोडले. मग तो परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहिला आणि सर्व लोकांशी बोलला.


संदेष्ट्याला स्वप्न सांगायचे असेल, तर त्यास सांगू द्या. पण ज्या कोणाला मी काही घोषीत करतो, त्याने माझे वचन सत्याने सांगावे. गव्हा पुढे गवत ते काय? परमेश्वर असे म्हणतो.


यहूदा लोकांस आणि यरूशलेमधील राहणाऱ्यांना यिर्मया संदेष्ट्याने पुढील संराष्ट्र घोषीत केला:


जे याजक हनन्या संदेष्टाच्यासमोर होते आणि सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते, तेव्हा यिर्मया संदेष्टा बोलला,


तेव्हा बारूखाने मोठ्याने यिर्मयाची गुंडाळीवरील वचने परमेश्वराच्या घरात शाफान लेखकाचा मुलगा गमऱ्या याच्या खोलीत, वरील अंगणात, नव्या दाराच्या प्रवेशाजवळ सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचली.


मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, “मी तुमचे ऐकले आहे. पाहा, मी तुमच्या विनंतीप्रमाणे तुमचा देव परमेश्वराकडे प्रार्थना करीन. जे काही परमेश्वर उत्तर देईल, मी तुम्हास सांगीन. मी तुमच्यापासून काहीही लपविणार नाही.”


यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दारात उभा राहा आणि हे वचन घोषीत कर! “हे यहूदातील लोकहो, जे तुम्ही सर्व परमेश्वराची उपासना करायला या दारातून आत जाता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका!


“तर त्यांना हे वचन सांगितले तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना या गोष्टी घोषीत केल्या तरी ते तुला उत्तर देणार नाहीत.


तेव्हा तो मला म्हणाला; “मानवाच्या मुला, जे काही मी तुला बजावले आहे ते आपल्या मानात साठवून घे आणि आपल्या कानांनी त्यांचे ऐक!


आता, मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घराण्यासाठी पहारेकरी केले आहे. तू माझ्या मुखातून वचन ऐकून आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर.


तो मनुष्य मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू आपल्या डोळ्यांनी पाहा व कानांनी ऐक. आणि मी तुला जे काही दाखवितो त्या सर्वाकडे आपले चित्त लाव, कारण मी ते तुला दाखवावे म्हणून तुला इकडे आणले आहे; जे काही तू पाहतोस ते इस्राएलाच्या घराण्याला प्रगट कर.”


आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”


तो दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असे. मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते.


येशूने त्यास उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानात आणि परमेश्वराच्या भवनात, सर्व यहूदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले आणि गुप्तपणे मी काही बोललो नाही.


नंतर पहाटेस तो पुन्हा परमेश्वराच्या भवनात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला.


जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हास सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हास माहीत आहे आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.


देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.


इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले, पाहा, “ज्या मनुष्यास तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर परमेश्वराच्या भवनात उभे राहून लोकांस शिक्षण देत आहेत.”


आणि दररोज, परमेश्वराच्या भवनात व घरोघर शिकवण्याचे, व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.


तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा. त्यामध्ये अधिक उणे करु नका.


तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वंशातून एक स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.


माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही कमी किंवा अधिक असे काही करु नका. अशासाठी की, तुमचा देव ह्याच्या ज्या आज्ञा मी तुम्हास देत आहे. त्या तुम्ही पाळाव्या.


इस्राएलाच्या संबध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरी यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखविल्या; त्यातला एकही शब्द त्याने गाळला नाही.


आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan