Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 26:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 “तर हिज्कीया यहूदाचा राजा आणि सर्व यहूदाने मीखाला ठार मारले काय? त्याने परमेश्वराबद्दल भय बाळगले की नाही? आणि त्याने परमेश्वराचा राग शांत केला, आणि त्याच्याविरुध्द जे अरिष्ट परमेश्वराने योजिले होते, त्या गोष्टी त्याने घडू दिल्या नाहीत. अशाने तर आम्ही आपल्याच जिवाविरूद्ध मोठे पाप करु.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 यहूदाचा राजा हिज्कीया व सर्व यहूदा ह्यांनी त्याला ठार केले काय? त्याने परमेश्वराचे भय धरून परमेश्वराचा प्रसाद मागितला नाही काय? त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे परमेश्वराने म्हटले होते त्याविषयी त्याला अनुताप झाला, तर मग अशाने आपण आपल्या जिवांची मोठी हानी करीत आहोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “परंतु यहूदीयाचा हिज्कीयाह राजा व इतर कोणी या संदेशाबद्दल मिखायाहला ठार केले का? हिज्कीयाहला याहवेहचे भय नव्हते काय व त्याने त्यांच्या कृपेची याचना केली नाही का? मग याहवेहनी ठरविलेली विपत्ती त्यांच्यावर आणण्याचा आपला विचार बदलला नाही का? आपण यिर्मयाहला ठार करून स्वतःवर घोर संकट आणणारच होतो!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 26:19
26 Iomraidhean Croise  

यरूशलेमेच्या संहारासाठी देवदूताचा हात उंचावला. पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वरास फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, “आता पुरे तुझा हात खाली घे.” तेव्हा हा देवदूत अरवना यबूसी याच्या खळ्याजवळ होता.


यामुळे राजा हिज्कीया आणि आमोजचा पुत्र यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करून मोठ्याने प्रार्थना केली.


“माझ्या आणि इस्राएल व यहूदा येथे आता शिल्लक असलेल्या लोकांच्या वतीने परमेश्वरास जाऊन विचारा. या पुस्तकातील वचनांविषयी त्यास विचारा. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराचे म्हणणे न जुमानल्यामुळे परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. आपल्या पूर्वजांचे वर्तन या पुस्तकातील वचनांना अनुसरुन नव्हते.”


तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला.


कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीतल्या राहणाऱ्यांच्या अन्यायाबद्दल शिक्षा करण्यास आपले स्थान सोडून येत आहे. मारल्या गेलेल्यांचे रक्त पृथ्वी प्रगट करेल, आणि आपल्या वधलेल्यांना यापुढे झाकून ठेवणार नाही.


मग असे झाले की, जेव्हा हिज्कीया राजाने त्यांचा निरोप ऐकून, त्याने आपले कपडे फाडले, स्वतःला गोणपाटाने झाकून आणि परमेश्वराच्या मंदिरात गेला.


परमेश्वर तुझा देव रब-शाकेचे शब्द ऐकेल, त्याचा धनी अश्शूरचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे, आणि जे शब्द तुझा देव परमेश्वर याने ऐकली आहेत त्यांचा तो कदाचित निषेध करील, म्हणून जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी आपली प्रार्थना उंच कर.


पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध मनुष्यास मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्यासही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरच मला तुमच्याकडे ह्यासाठी पाठवले आहे की ही सर्व वचने तुमच्या कानात बोलावी.”


कदाचित् ते ऐकतील आणि प्रत्येक जण त्याच्या कुमार्गापासून वळेल, त्यांच्या कर्मांच्या दुष्टपणाबद्दल त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन.


म्हणून आता, सेनाधीश परमेश्वर आणि इस्राएलाचा देव असे म्हणतो, “तुम्ही आपल्या स्वत:विरूद्ध हे मोठे अनिष्ट का करता? तुम्ही आपणासाठी पुरुष व स्त्रिया, मुले व बालके यांना यहूदापासून तोडण्याचे कारण का होता? तुमचा अवशेष उरणार नाही.


मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मन परिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”


तू अनेक लोकांस मारलेस, त्यामुळे तू स्वत:च्या घरासाठी अप्रतिष्ठा तयार केली आहेस आणि आपल्या स्वत:च्या जिवा विरुद्ध पाप केले आहेस.


बेथेलच्या लोकांनी शरेसर, रगेम्मेलेक व त्यांची माणसे यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून पाठवले.


लोकांनी माझ्याविरूद्ध पाप केले आणि त्यांच्या पापामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. पण धुपाटणी भांडी अजूनही पवित्र आहेत. ही भांडी पवित्र आहेत कारण ती परमेश्वरास अर्पण केली होती. भांडी ठोकून त्याचा पत्रा कर. या पत्र्याचा उपयोग वेदी झाकायला कर. इस्राएलाच्या सर्व लोकांस हा ताकीद दिल्याचा इशारा असेल.


म्हणजे नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला वेदी आणि पवित्रस्थान यांच्यामध्ये ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्यांचा दोष तुमच्यावर यावा.


परंतु ते देवाचे असल्यास तुम्हास ते नष्ट करता यावयाचे नाही, तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.”


कारण त्यांनी पवित्रजनांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त पाडले, आणि तू त्यांना रक्त प्यायला दिलेस; कारण ते याच लायकीचे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan