Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 26:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध मनुष्यास मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्यासही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरच मला तुमच्याकडे ह्यासाठी पाठवले आहे की ही सर्व वचने तुमच्या कानात बोलावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 एवढे मात्र पक्के समजा की, तुम्ही मला जिवे माराल तर तुम्ही आपणांवर, ह्या नगरावर व ह्यातील रहिवाशांवर निर्दोष रक्त पाडल्याचा दोष आणाल; कारण वास्तविक ही सर्व वचने तुमच्या कानी पडावीत म्हणून परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 परंतु एक गोष्ट नक्की, तुम्ही मला ठार केले, तर एका निरपराध मनुष्याला ठार केल्याचा ठपका तुमच्यावर, या नगरावर व येथील प्रत्येक रहिवाशावर येईल; कारण तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द तुम्हाला सांगण्यासाठी याहवेहने मला पाठविले, हे अगदी सत्य आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 26:15
21 Iomraidhean Croise  

देव म्हणाला, “तू हे काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून शिक्षेसाठी ओरड करत आहे.


मग रऊबेन त्यांना म्हणाला, “मी तुम्हास म्हणत नव्हतो का की, ‘मुलाविरूद्ध पाप करू नका,’ परंतु तुम्ही ते ऐकले नाही. आता पाहा, त्याचे रक्त तुमच्यापासून मागितले जात आहे.”


मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. सारे यरूशलेम त्यांच्या रक्ताने माखले. या पापांना परमेश्वराजवळ क्षमा नव्हती.


जखऱ्याचे पिता यहोयादा यांनी दाखवलेले सौजन्य राजा योवाश विसरला. यहोयादाचा पुत्र जखऱ्या याला राजाने ठार केले. जखऱ्या मृत्यूपूर्वी म्हणाला, “हे पाहून परमेश्वर तुला शासन करो.”


परमेश्वर अशा या सहा गोष्टींचा द्वेष करतो, त्यास अशा सात गोष्टींचा वीट आहेः


गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ, निरपराध्यांचे रक्त पाडणारे हात,


“तुझ्या लोकांस मी शिक्षा केली ती व्यर्थ झाली आहे. त्यांनी शिस्त स्विकारली नाही, नाश करणाऱ्या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या भविष्यावाद्यांना खाऊन टाकले.”


गरीब व निष्पाप यांच्या जिवांचे रक्त तुझ्या कपड्यांवर सापडले आहे. तुझे घर फोडताना तुला ते सापडले नाहीत.


पण तुझ्या दृष्टीस आणि हृदयात अनीतीने मिळवलेली मिळकत आणि निर्दोष व्यक्तीचे रक्त पाडणे, आणि पीडणे व जूलूम करणे या शिवाय काही नाही.


परमेश्वर असे म्हणतो, “न्याय आणि न्यायीपण कर, आणि जो कोणी लूटलेला आहे, त्यास पीडणाऱ्याच्या हातातून सोडव. तुझ्या देशात राहणाऱ्या परदेशी, अनाथ, विधवा, कोणालाही त्रास देऊ नको, त्यांचे काही वाईट करू नको किंवा निरपराध्यांचे रक्त पाडू नको.


मग यिर्मया यहूदाच्या अधिकाऱ्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “जी वचने तुम्ही ऐकली, ती या नगरीबद्दल व या मंदिराबद्दल हे भविष्य म्हणून सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठवले.


यिर्मयाला परमेश्वरापासून जे वचन आले ते हे आहे आणि म्हणाले,


जर तू देशात राहणाऱ्याचे, अनाथाचे, आणि विधवेचे शोषण करणार नाहीस, आणि या स्थानात निर्दोष रक्त पाडणार नाहीस आणि स्वत:चे नुकसान करून घ्यायला इतर देवतांच्या मागे चालणार नाहीस,


ज्या देशात तुम्ही रहाल तो भ्रष्ट करू नका. कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित होऊ शकत नाही.


मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “रब्बी, तो मी आहे का?” येशू त्यास म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे.”


सभेत त्यांनी मिळून मसलत केली की, येशूला कपटाने अटक करून आणि जिवे मारावे.


मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.


म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या भूमीवर निर्दोष मनुष्यांचा रक्तपात होणार नाही आणि अशा हत्येचे दोष तुम्हास लागणार नाही.


कारण त्यांनी पवित्रजनांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त पाडले, आणि तू त्यांना रक्त प्यायला दिलेस; कारण ते याच लायकीचे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan