यिर्मया 24:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी त्यांना एक भयावह गोष्ट बनवीन, मी त्यांना सर्व मानवजातीच्या दृष्टीत अरिष्ट असे करीन, ते जीथे घालवले जातील तीथे ते चेष्टेचा व निंदा, म्हण व शाप असे होतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप ह्यांचे विषय होतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी त्यांना असे करेन की पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्राला त्यांची घृणा येईल, आणि मी जिथे मी घालवून देईन, तिथे निंदा, कुचेष्टा, शाप आणि ते उपहासाचा विषय होतील. Faic an caibideil |
यास्तव परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही प्रत्येकाने आपल्या भावास व सहकारी इस्राएलास स्वातंत्र्य जाहीर करायचे होते. तुम्ही माझे ऐकले नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हाविरुध्द तलवारीला, मरीला आणि दुष्काळाला स्वातंत्र्य जाहीर करतो, कारण पृथ्वीवरील प्रत्येक राज्याच्या दृष्टीने मी तुम्हास असे काही करीन की, त्याबद्दल ऐकून भीतीने थरथर कापाल.
कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, जसा माझा क्रोध व माझा संताप यरूशलेमेवरचा माझा राग व्यक्त करून दाखविला. यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर ओतला आहे तसा माझा क्रोध जर तुम्ही मिसरमध्ये जाल तेव्हा तुम्हावर ओतला जाईल. तुम्ही शापाची वस्तू व्हाल व भयचकीत, शाप बोलण्याचा विषय आणि काहीतरी निंदनीय व्हाल. आणि हे ठिकाण तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही.