Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 24:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मला ओळखण्याचे हृदय मी त्यांना देईल, मग मी परमेश्वर आहे. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. ते सर्व अंत:करणापासून माझ्याकडे परत येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यांना देईन; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन; कारण ते मनापासून माझ्याकडे वळतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मी त्यांना असे अंतःकरण देईन जेणेकरून ते मला ओळखतील, की मीच याहवेह आहे. ते माझे लोक होतील व मी त्यांचा परमेश्वर होईन, कारण ते पूर्ण अंतःकरणाने माझ्याकडे परत येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 24:7
32 Iomraidhean Croise  

असतील तिथून ते अंतःकरणातून तुला शरण येतील. या देशाच्या तू त्याच्या पूर्वजांना दिलेल्या देशाच्या दिशेने आणि तू निवडलेल्या नगराच्या दिशेने पाहत ते प्रार्थना करतील. तुझ्या नावाकरिता मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने पाहत ते प्रार्थना करतील.


जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते आशीर्वादित आहेत.


मी माझे शब्द तुझ्या तोंडी घालीन आणि माझ्या हाताच्या छायेत तुला झाकले आहे. अशासाठी की, मी आकाशाची स्थापना करावी आणि पृथ्वीचा पाया घालावा, आणि तू माझी प्रजा आहे, असे सियोनेला म्हणावे.


तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढून आणले, त्यावेळी मी त्यांना हा करार आज्ञापिला आणि ही वचने आचरनात आणा, तर तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईन.


कारण परमेश्वर असे म्हणतो, जेव्हा बाबेलाच्या राज्यास सत्तर वर्षे होतील, मी तुम्हास मदत करील आणि तुम्हास या स्थळी परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन.


इस्राएलची विश्वासघातकी बहीण (यहूदा) मनापासून माझ्याकडे परत आली नाही, तर येण्याचे तिने फक्त ढोंग केले. असे परमेश्वर म्हणतो


मग तुम्ही लोक माझे व्हाल आणि मी तुमचा देव होईन.”


मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. तर मी आज्ञा केलेल्या सर्व मार्गात चाला, म्हणजे तुमचे चांगले होईल.


म्हणून परमेश्वर देव असे म्हणतो, जेथून तुम्ही विखुरले गेलात त्याच ठिकाणी आणून तुम्हास एकत्र करीन आणि मी इस्राएल देश तुम्हास देईन.


यासाठी इस्राएल घराणे माझ्यापासून परागंदा होणार नाही ते आपल्या पातकामुळे स्वतःला अशुद्ध करणार नाहीत, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन, असे परमेश्वर देव म्हणतो.


तुझ्या सोबत करार स्थापीत करेल, मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.


मग ते यापुढे आपल्या स्वत:ला मूर्तीपुढे वा त्यांच्या तिरस्करणीय वस्तूंनी किंवा त्यांचे कोणतेही पापांनी आपणाला विटाळविणार नाहीत. त्यांनी ज्या आपल्या राहण्याच्या स्थानात पाप केले आहे त्या सर्वातून मी त्यांना तारीन व त्यांना शुद्ध करीन, यासाठी की, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.


माझे निवासस्थान त्यांच्यामध्ये राहील. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.


मग त्या दिवसापासून पुढे, मीच त्यांचा परमेश्वर देव आहे असे इस्राएलाच्या घराण्यास समजेल.


आणि भूमी धान्य, नवा द्राक्षरस आणि तेल देईल आणि ते इज्रेलास उत्तर देतील.


त्या तिसऱ्या भागाला मी अग्नीत टाकीन, आणि चांदीला शुद्ध करताता तसे त्यांना शुद्ध करीन; सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘हे माझे लोक आहेत.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव आहे.’”


मी त्यांना घेऊन येईन आणि ते यरूशलेमेमध्ये राहतील. ते सत्याने व धर्माने पुन्हा माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.”


पण देवाला धन्यवाद कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या.


पण आता, ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात, ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.


त्या दिवसानंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा करार करीन; तो हा मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात घालीन, त्यांच्या हृदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होईन, ते माझे लोक होतील.


शमुवेल इस्राएलाच्या सर्व घराण्याशी बोलला तो म्हणाला, “जर तुम्ही आपल्या सर्व मनाने परमेश्वराकडे परत वळता, तर आपणापासून परके देव आणि अष्टारोथ दूर करा, तुम्ही आपली मने परमेश्वराकडे लावा, आणि केवळ त्याचीच सेवा करा, म्हणजे तो तुम्हास पलिष्ट्यांच्या हातून सोडवील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan