Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 24:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वराच्या मंदिरासमोर दोन अंजिराच्या टोपल्या व्यवस्थित मांडलेल्या मी पाहिल्या. (बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकोन्याला व यहूदाचे सरदार व कारागीर व लोहार कैद करून नेले, यरूशलेममधून बाबेलला नेले)

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यहोयाकीम ह्याचा पुत्र यकोन्या जो यहूदाचा राजा त्याला व यहूदाचे सरदार, कारागीर व लोहार ह्यांना नबुखद्रेस्सराने धरून यरुशलेमेतून बाबेलास नेल्यानंतर परमेश्वराने मला हे दाखवले; पाहा, परमेश्वराने मंदिरासमोर अंजिराच्या दोन टोपल्या ठेवल्या होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 बाबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीम याचा पुत्र, यकोन्याह, याच्याबरोबरच यहूदीयाचे अधिपती, निष्णात सुतार व लोहार असे कारागीर यांना यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवासात नेले. या घटनेनंतर याहवेहने यरुशलेम येथील मंदिरासमोर अंजीर भरून ठेवलेल्या दोन टोपल्या मला दाखविल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 24:1
22 Iomraidhean Croise  

यावेळी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारभाऱ्यांनी यरूशलेम नगराला वेढा दिला.


राजा नबुखद्नेस्सरने वर्षारंभी काही सेवक पाठवून यहोयाखीनाला परमेश्वराच्या मंदिरातील बहुमोल खजिन्यासह बाबेलला आणवले. यहोयाखीनाच्या वडिलांचा भाऊ सिद्कीया याला नबखद्नेस्सरने यहूदा व यरूशलेमचा राजा केले.


आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा.


नेगेबमधील शहरे बंद केली गेली आहेत, ती उघडायला कोणी नाही. यहूदाला बंदिस्त केले आहे, तिच्यातील सर्व हद्दपार करण्यात आले आहेत.


म्हणजे बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या याला, यहूदाचे व यरूशलेमेचे सरदार यांना कैद करून बाबेलास नेले, तेव्हा त्या वस्तू नेल्या नव्हत्या.


यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या व बाबेलास कैद करून नेलेले यहूदाचे जे सर्व लोक यांस मी परत या ठिकाणी आणीन असे परमेश्वर म्हणतो, कारण मी बाबेलाच्या राजाचे जोखड मोडीन.


बंदिवान करून नेलेल्यांतील राहिलेले वडील याजक, संदेष्टे आणि यरूशलेमेमधून बाबेलास ज्यास नबुखद्नेस्सराने कैद करून नेले होते, त्या सर्व लोकांस यिर्मया संदेष्ट्याने यरूशलेमेहून पत्र पाठवले.


राजा यकन्या, राजमाता, व उच्च अधिकारी, यहूदाचे व यरूशलेमेचे नेते, व कारागीर हे यरूशलेमेमधून निघून गेल्यावर यिर्मयाने हे पत्र पाठवले.


आता यहोयाकीमचा मुलगा कोन्या याच्याऐवजी, योशीयाचा मुलगा सिद्कीया हा राजा म्हणून राज्य करीत होता. बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने, सिद्कीयाला यहूदा देशावर राजा केले होते.


त्यांच्या फांदीचा शेंडा मोडून टाकला आणि त्यास कनानात घेऊन गेला, त्यास व्यापाऱ्यांच्या शहरात लावले.


त्यास पिंजऱ्यात कोंडून ताळेबंद केले आणि बाबेलाच्या राज्यापुढे आणले, त्यांना त्यास तटबंदी असलेल्या डोंगरावर नेले यास्तव त्याचा स्वर इस्राएलाच्या घराण्याला आता ऐकू जाणार नाही.


खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना प्रगट केल्यावचून, प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही.


परमेश्वराने मला असे दाखविले की पाहा, वसंत ऋतुचे पीक वर येत असताच त्याने टोळ निर्माण केले. पहिल्या पिकाची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे पीक होय.


प्रभू परमेश्वराने, मला पुढील गोष्टी दाखविल्या, पाहा, परमेश्वर देवाने अग्नीला न्याय करण्यास बोलावले. त्याने महासागर कोरडा केला व भूमीही खाऊन टाकणार होता.


परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. पाहा, परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता.


मग परमेश्वराने मला चार लोहार दाखवले.


देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशवा परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्यास दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan