Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 संदेष्ट्यांबद्दल माझे हृदय माझ्या आत तुटले आहे आणि माझी सर्व हाडे थरथरत आहेत. कारण परमेश्वर व त्याच्या पवित्र वचनांमुळे, माझी स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे. ज्यावर द्राक्षरस हावी झाले आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 संदेष्ट्यांविषयी : माझे हृदय माझ्या ठायी भग्न झाले आहे; माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत; परमेश्वर व त्याची पवित्र वचने ह्यांमुळे मी मद्यप्यासारखा, द्राक्षारसाने मस्त झालेल्या मनुष्यासारखा झालो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 संदेष्ट्याविषयी: माझे अंतःकरण विदीर्ण झाले आहे; माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत. मद्यप्यासारखा माझा झोक जात आहे, एखाद्या बलवान पुरुषावर मद्याने मात केली आहे, कारण याहवेह व त्यांचे पवित्र शब्द.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:9
21 Iomraidhean Croise  

तू तुझ्या लोकांस कठीण गोष्टी दाखवल्या आहेत; तू आम्हास झिंगवण्यास लावणारा द्राक्षरस पाजला आहे.


निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे; माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता; मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही.


एफ्राइममधील मद्यप्यांनो तुमच्या गर्वाच्या मुकुटाला हायहाय! आणि धुंद झालेल्या सुपिक खोऱ्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फुल त्यास हायहाय!


तुम्ही विस्मित व आश्चर्यचकित व्हा, तुम्ही आपणास आंधळे करा आणि आंधळे व्हा. ते धुंद आहेत पण द्राक्षरसाने नव्हे. ते झूलत आहेत पण मद्याने नव्हे.


पण आता हे ऐक, जी तू पीडीत व मस्त आहेस पण द्राक्षरसाने नाही,


तेव्हा मी म्हणालो, “मला हाय हाय आहे! कारण मी आता मरणार आहे. कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, कारण माझ्या डोळ्यांनी राजाला, परमेश्वरास, सेनाधीश परमेश्वरास पाहीले आहे.”


जर मी असे बोललो, मी परमेश्वराबद्दल आता ह्यापुढे विचार करणार नाही, मी त्याचे नाव ह्यापुढे घोषीत करणार नाही. पण त्याचे वचन माझ्या हृदयात, माझ्या हाडांत आग असल्यासारखे होते. म्हणून मी ते समाविष्ट करण्यास संघर्ष करतो परंतु मी त्यामध्ये सक्षम होत नाही.


असे झाले की, जेव्हा त्यांनी सर्व वचने ऐकली तेव्हा प्रत्येक मनुष्य भयभीत होऊन एकमेकांकडे वळले. ते बारूखाला म्हणाले, “आम्ही ही सर्व वचने खचित राजाला कळवतो.”


भविष्यवादी खोटेपणाने भविष्य सांगतात, आणि याजक त्यांच्या शक्तीने अधिकार गाजवतात. ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांस हे प्रिय आहे! पण शेवटी काय होणार?”


माझ्या दु:खण्याला काही अंत नाही आणि माझे अंत: करण अस्वस्थ आहे.


जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांच्या कन्येसाठी अहोरात्र रडलो असतो तर किती बरे झाले असते.


त्याने मला कडूपणाने भरले आहे, त्याने मला कडू दवणा प्यायला भाग पाडले आहे.


प्रभू परमेश्वर असे म्हणतो; मूर्ख संदेष्ट्यांबद्दल दिलगीरी आहे. जे आपल्या स्वतःच्या आत्म्याचे अनुसरण करतात, पण आपले दर्शन बघत नाही.


परमेश्वर देव त्यांना म्हणाला, “यरूशलेमेच्या मध्य भागातून प्रवेश करा, जे पुरुष विव्हळ झाले, त्यांच्या माथ्यावर खुण करा, आणि शहरात केलेल्या सगळ्या अपवित्र गोष्टींसाठी उसासे टाका.”


म्हातारे असो, तरुण, कुमारी, लहान मुले किंवा स्त्रिया सर्वांना मारुन टाका. पण ज्याच्या माथ्यावर खुण आहे त्याच्याजवळ जाऊ नका. माझ्या पवित्र ठिकाणाहून सुरुवात करा, मग म्हाताऱ्यापासून सुरुवात केली व माझ्या निवासापुढे आले.


तेव्हा मी दानीएल बरेच दिवस अशक्त होऊन आजारी पडलो मग मी बरा होऊन राजकामासाठी गेलो तो दृष्टांत मी सगळ्यांना सांगितला पण त्यास समजणारा कोणीच नव्हता.


मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे.


कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मरण पावलो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan