Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 23:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, जो त्यांना पाळील, म्हणजे ती घाबरणार नाहीत व भयभीत होणार नाहीत. त्यातील एकही हरवणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, ते त्यांना चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्यांची काळजी घेण्यासाठी मी असे मेंढपाळ नेमीन, जे त्यांचे संगोपन करतील, व त्यांना पुन्हा भीती आणि दहशत वाटण्याचे कारण राहणार नाही, तसेच त्यातील कोणी हरविणारही नाही,” असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 23:4
25 Iomraidhean Croise  

त्यादिवशी, असे होईल की प्रभू आपल्या अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व भूसमुद्रातील त्याच्या उर्वरीत लोकांस परत मिळविण्यासाठी आपले हात लांब करील.


परमेश्वर असे म्हणतो, म्हणून तू याकोबा, माझ्या सेवका, घाबरु नकोस, आणि इस्राएला, हिंमत खचू नको. कारण पाहा, मी तुला दूर स्थानातून परत आणीन आणि तुझ्या वंशजांना बंदिवासाच्या देशातून तारीन. याकोब पुन्हा येईल आणि शांती असेल; तो सुरक्षित राहील आणि तेथे कोणी दहशत घालणार नाही.


राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा. तुम्ही राष्ट्रांनी म्हणावे, ज्याने इस्राएल विखरला तोच त्यास एकवटील आणि जसा मेंढपाळ आपल्या कळपाला राखतो तसा तो त्यास राखील.


तर याकोबाची संतती व माझा सेवक दावीद याच्या संततीचा मी त्याग करीन आणि दावीदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या संततीवर सत्ता चालविण्यास ठेवणार नाही; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन व त्याजवर दया करीन.”


मनुष्य व पशू यांना बहुतपट करीन आणि ते वाढतील व फळ देणारे होतील; पूर्वीच्याप्रमाणे लोक राहू लागतील. आणि तुमच्या पूर्वदिवसात केले त्यापेक्षा तुमचे मी अधिक कल्याण करीन मग तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे.


मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हास भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन;


त्याऐवजी, प्रत्येक मनुष्य आपल्या द्राक्षवेलीखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबरवणार नाही. कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.


पण हे, बेथलहेम एफ्राथा. जरी तू यहूदातील सर्व कुळांत सर्वात लहान आहेस. तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलात अधिकारी व्हायला एकजण निघेल. त्याचा प्रारंभ पुरातन काळापासून, प्राचीन काळापासून आहे.


म्हणून तू आपल्या लोकांस, तुझ्या वतनाचा कळप जो रानात चरतो त्याला, आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचीन दिवसात तसे बाशानांत व गिलादांत ते चरोत.


“इस्राएलमधील उरलेले वाईट कृत्ये करणार नाहीत व खोटे बोलणार नाहीत. त्यांच्या मुखात कपटी जीभ आढळणार नाही. ते चरुन आडवे पडून राहतील व त्यांना कोणीही त्रास देणार नाही.”


त्यांनी मोशेला सांगितले, आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही.


जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.


“जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरविला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले.


आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan