Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 कारण यहूदाचा राजाच्या राजवाड्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो की, गिलादाप्रमाणे किंवा लबानोनच्या शिखराप्रमाणे तू आहेस, पण तरीही मी त्यास वाळवंटामध्ये पालटून टाकीन. निर्जन शहराप्रमाणे तो होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 कारण यहूदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वर म्हणतो : तू मला गिलाद, लबानोनाचे शिखर असे आहेस; मी तुला खातरीने ओसाड भूमीसारखे, निर्जन नगरासारखे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 कारण या यहूदीयांच्या राजवाड्यासंबंधी, याहवेह असे म्हणाले: “जरी तू मला गिलआद प्रांतासारखा आहे, व लबानोनच्या शिखरासारखा आहेस, मी निश्चितच तुझा विध्वंस करून तुला ओसाड आणि निर्जन नगरीसारखे करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:6
26 Iomraidhean Croise  

ते भाकरी खाण्यास खाली बसले. त्यांनी वर नजर करून पाहिले, तो पाहा, इश्माएली लोकांचा तांडा मसाल्याचे पदार्थ व सुगंधी डिंक व बोळ लादलेल्या उंटांसहीत गिलाद प्रदेशाहून येत होता. ते खाली मिसर देशाकडे चालले होते.


आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो. कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.


(त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) अहा! प्रिये, तू सुंदर आहेस! तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे डोळे कबुतर असे आहेत. तुझे केस गिलाद पर्वताच्या उतारावरुन जाणाऱ्या शेरड्याच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.


त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत. त्याचे रुप लबानोनासारखे आहे. ते गंधसरू झाडासारखे उत्कृष्ट आहे.


कारण तटबंदी असलेले शहर नाश झाले आहे आणि वस्ती असलेले राणासारखी सोडून दिलेली आहे. वासरू तेथे चरेल आणि तेथे बसेल आणि त्याच्या फांद्या खाऊन टाकेल.


तू आपल्या सेवकांकडून प्रभूची अवज्ञा करून म्हटले, मी आपल्या पुष्कळशा रथाबरोबर मी पर्वताच्या उंचावर, लबानोनाच्या अगदी आतल्या भागावर चढून आलो आहे, त्याचे उंच गंधसरू, व त्याचे निवडक देवदारू मी तोडीन आणि मी त्याच्या अगदी दूरच्या उंचीवर त्याच्या फळझाडांच्या जंगलात प्रवेश करीत आलो


तेव्हा मी म्हटले, “प्रभू, असे किती वेळपर्यंत?” त्याने उत्तर दिले, “नगरे चिरडून उध्वस्त आणि रहिवाशांविरहित होईपर्यंत, आणि घरे लोकविरहीत व जमीन उजाड वैराण होईपर्यंत,


यहूदाच्या राजाच्या घराण्याविषयी परमेश्वराचे वचन ऐका.


परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या कर्माच्या फळाप्रमाणे मी तुम्हास शिक्षा करीन. आणि मी तिच्या वनात अग्नी पेटवीन तेव्हा ते सभोवतीचे सर्वकाही जाळून टाकेल.”


“परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, यहोयाकीमचा, यहूदाच्या राजा, याचा मुलगा, कोन्या, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते.


“ते म्हणाले, मोरेष्टचा मीखा, हा हिज्कीया यहूदाचा राजाच्या दिवसात भविष्यसांगत असे. तो यहूदाच्या सर्व लोकांस म्हणाला, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, सियोनेचा नाश होईल सियोन नांगरलेले शेत होईल. यरूशलेम दगडांची रास होईल. मंदिर असलेली टेकडी वनातील उंच टेकडी सारखी होईल.”


अरिष्टामागून अरिष्ट घोषीत करण्यात आले आहे. कारण संपूर्ण देशाचा नाश झाला आहे. एकाएकी त्यांनी माझ्या तंबूचा व कनातींचा नाश केला आहे.


सिंह त्याच्या झाडीतून बाहेर आला आहे, आणि राष्ट्रांचा नाश करणारा निघाला आहे. जिथे कोणी राहत नाही असे, तुमच्या शहरांना भयामध्ये आणि ओसाडी मध्ये पालटायला तो आपल्या स्थानांतून निघून येत आहे.


तरी तुमची आई अत्यंत लज्जित होईल. जी कोणी तुला जन्म देणारी तिला लाज वाटेल. पाहा, ती राष्ट्रांत क्षुद्र, रान, कोरडी भूमी आणि वाळवंट होईल.


यहूदाच्या गावांतील व यरूशलेमेच्या रस्त्यांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. वधू वरांचा शब्द उमटणार नाही, कारण भूमी ओसाड होईल.”


गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय? मग माझ्या लोकांच्या कन्येला आरोग्य का लाभले नाही.


म्हणून मी यरूशलेम नगरी कचऱ्याचा ढीग करीन. ते कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”


ह्यास्तव, तुमच्यामुळे सियोन शेतासारखे नांगरले जाईल, यरूशलेम नासधुशीचा ढीग होईल, आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या टेकडीसारखा होईल.


हे लबानोना, अग्नीने आत शिरुन तुझे गंधसरू जाळून टाकावेत म्हणून तू आपली दारे उघड.


रऊबेन आणि गाद या घराण्यांकडे गुरांढोरांची खूप खिल्लारे होते. त्यांनी याजेर व गिलाद येथील जमिनी पाहिल्या. ही जमीन आपल्या गुरांढोरांसाठी चांगली आहे असे त्यांना वाटले.


तेव्हा कृपाकरून मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan