Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 22:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मेलेल्यां करिता रडू नको आणि शोक करू नको, परंतू जे कोणी पाडावपणात गेले आहेत त्याच्यासाठी रडा, कारण तो परतून त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मृतासाठी रडू नका, त्याच्याकरता शोक करू नका; तर देशांतर करणार्‍यासाठी आक्रोश करा; कारण तो परत येणार नाही, त्याला त्याच्या जन्मभूमीचे पुन्हा दर्शन होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मेलेल्यां राजासाठी रडू नका किंवा त्यांच्या हानीकरिता शोक करू नका; त्याऐवजी, जो बंदिवासात गेला आहे त्याच्यासाठी विलाप करा, कारण तो मायदेशी परत येणार नाही किंवा मातृभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 22:10
19 Iomraidhean Croise  

“ती तुझी तुझ्या पूर्वजांशी भेट करून देईन. तुला मरण येईल आणि तू सुखाने कबरीत पडशील. यरूशलेमेवर येणारे अरिष्ट तुला आपल्या डोळ्यांनी पाहावे लागणार नाही.” मग याजक हिल्कीया, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया यांनी हा संदेश राजाला सांगितला.


योशीयाच्या कारकिर्दीत, मिसरचा राजा फारो-नखो याने फरात नदीजवळ अश्शूरच्या राजावर स्वारी केली. तेव्हा योशीया फारो-नखोवर चाल करून गेला. पण मगिद्दो येथे फारो-नखोने त्यास पाहिले आणि ठार केले.


मिसरच्या राजाने आहाजाचा भाऊ एल्याकीम याला यहूदा आणि यरूशलेमेचा राजा केले. यानंतर त्याचे नामांतर करून यहोयाकीम असे ठेवले आणि यहोआहाजाला नखोने मिसरला नेले.


म्हणून मी मरण पावलेल्यांचे अभिनंदन करतो. जे आज जिवंत आहेत, व अद्याप जगत आहेत त्यांचे नव्हे,


धार्मिक नाश पावतो, पण कोणीच हे विचारात घेत नाही. आणि कराराचे विश्वासू लोक एकत्र जमले, पण कोणासही हे समजले नाही की, धार्मिक दुष्टांमुळे एकत्र झाला आहे.


मृतांबद्दल शोक करणाऱ्यांसाठी कोणीही अन्न आणणार नाही. ज्यांचे आईवडील गेले आहेत, त्यांचे कोणी सांत्वन करणार नाही. मृतांसाठी शोक करणाऱ्यांसाठी, कोणीही पेये आणून सांत्वन करणार नाही.


कारण यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा शल्लूम ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: जो त्याचा पिता योशीया याच्याठिकाणी राज्य करीत होता, त्याने आपले ठिकाण सोडले आहे आणि तो परत येणार नाही.


यास्तव यहूदाचा राजा, योशीया, याचा मुलगा यहोयाकीम ह्याविषयी परमेश्वर असे म्हणतो की, हाय! माझ्या बंधू, किंवा हाय! माझ्या बहिणी, असे बोलून ते त्याच्याकरीता शोक करणार नाही. “हाय! स्वामी! हाय! प्रभू! असे बोलून ते विलाप करणार नाही.


आणि तुम्ही या भूमीत परत यायला पाहाल, पण ते परत येणार नाही.”


“परमेश्वर मला म्हणाला, यिर्मया, तू त्यांना असे सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो: प्या आणि त्यामुळे झिंगा आणि वांत्या करा, पडा आणि मी पाठवत असलेली तलवार येण्यापर्यंत परत उठू नका.


यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या व बाबेलास कैद करून नेलेले यहूदाचे जे सर्व लोक यांस मी परत या ठिकाणी आणीन असे परमेश्वर म्हणतो, कारण मी बाबेलाच्या राजाचे जोखड मोडीन.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, जसा माझा क्रोध व माझा संताप यरूशलेमेवरचा माझा राग व्यक्त करून दाखविला. यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर ओतला आहे तसा माझा क्रोध जर तुम्ही मिसरमध्ये जाल तेव्हा तुम्हावर ओतला जाईल. तुम्ही शापाची वस्तू व्हाल व भयचकीत, शाप बोलण्याचा विषय आणि काहीतरी निंदनीय व्हाल. आणि हे ठिकाण तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही.


म्हणून यहूदाचे जे कोणी उरलेले, फरारी, वाचलेले मिसर देशात उपरी म्हणून राहायला गेले आहेत, त्यातले जे कोणी ज्यांची यहूदा देशात परत जाण्याची आणि तेथे राहण्याची इच्छा आहे. त्यातील कोणीही परत जाणार नाही, कारण जे कोणी थोडके निसटून जातील त्यांच्यावाचून दुसरे कोणी परत जाणार नाहीत.”


जे उपासमारीने मरण पावले त्यांच्यापेक्षा जे तलवारीने मरण पावले त्यांचे बरे झाले आहे. कारण उपासमार झालेले फारच दु:खी होते. ते व्याकुळ झाले होते. शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मरण पावले.


मानवाच्या मुला पाहा! तुझ्या डोळ्यांना जे उत्तम वाटते ते तुझ्यापासून मी काढून घेईन, तरी तू दुःख करु नये व आसवेही गाळू नये व आपली वाहने फाडू नयेत.


येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan