Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण जेव्हा मी बोललो, तेव्हा मी ओरडलो, मी हिंसा आणि विध्वंस ह्याबद्दल आरडाओरड करतो. कारण परमेश्वराचे वचन सारा दिवस माझ्यासाठी निंदा व उपहास असे करण्यात आले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कारण मी बोलू लागलो की, “जुलूम, लूट!” हे शब्द मला उच्चारावे लागतात आणि दिवसभर परमेश्वराचे वचन माझ्या निंदेला व अप्रतिष्ठेला कारण झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जेव्हा मी बोलू लागतो, मी आक्रोश करतो हिंसाचार व विनाश हेच जाहीर करतो. कारण याहवेहच्या वचनामुळे माझ्या वाट्याला दिवसभर निंदा व अप्रतिष्ठाच आली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:8
26 Iomraidhean Croise  

नंतर अलीशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता, लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”


पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.


तुम्ही आनंदाने कोणाचा उपहास करता? कोणा विरूद्ध तुम्ही आपले तोंड उघडता आणि जीभ काढता? तुम्ही बंडखोरांची मुले, खोट्यांची संतान नाही काय?


माझ्या आई, मला हाय हाय! कारण सर्व पृथ्वीला वाद आणि यूक्तिवादाचा पुरुष असे तू मला जन्म दिला आहे. मला कोणाचे देणे नाही, किंवा त्यांनी मला काही देणे नाही, तरी पण ते सर्व मला शाप देतात.


परमेश्वरा, तू जाणतोस, माझी आठवण ठेव व मदत कर. माझ्या करीता, माझ्या माझ्यापाठीस लागणाऱ्यांविरूद्ध सूड घे. तुझ्या सहनशीलतेत मला दूर घालवू नकोस, तुझ्याकरीता मी दु: ख सहन केले, हे जाण.


पण जर तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र पाळण्यासाठी माझे ऐकले नाही, जर तुम्ही शब्बाथाच्या दिवशी यरूशलेमेच्या दारात ओझे वाहिले, तर मी दारात कधींही विझू न शकणारी आग लावीन, ही आग यरूशलेमचे राजवाडे खाऊन टाकील आणि ती विझवली जाणार नाही.”


परमेश्वरा, तू मला वळवले आणि मी खरच वळलो, तू माझ्यापेक्षा सामर्थी असल्याने तू जिंकलास मी हास्याचे कारण ठरलो आहे. माझा प्रत्येक दिवस चेष्टेने भरलेला असतो.


माझ्यापूर्वी आणि तुझ्यापूर्वी फार पूर्वी अनेक संदेष्टे होऊन गेले, त्यांनीसुद्धा अनेक देशाविषयी व मोठ्या राज्यांविषयी, लढायांविषयी, दुष्काळ व मरी येतील असे भाकीत केले होते.


परमेश्वर म्हणतो, “यरूशलेमच्या रस्त्यावरुन धावा, सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. सत्याचा शोध घेणारा आणि न्यायीपणाने चालणारा, असा कोणी एक मनुष्य जरी आढळला, तरी मी यरूशलेमेची क्षमा करीन.


म्हणून गर्द झाडीतून सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराविरूद्ध येईल. जो कोणी शहरातून बाहेर जाईल तो फाडण्यात येईल. कारण त्यांची पापे बहूतपट झालीत, आणि त्यांचे अविश्वासू कृत्ये फार झाली आहेत.


मी कोणाला घोषीत करू आणि चेतावणी देऊ, जेणेकरून ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुंता आहे म्हणून त्यांना ऐकू येत नाही. पाहा, परमेश्वराचे वचन त्यांची चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या जवळ आले आहे, पण त्यांना ते नको आहे.


तुम्ही चोरी, खून आणि व्यभिचार आणि खोटी शपथ वाहाल आणि बालमुर्तीस धूप जाळाल आणि ज्या देवांना तुम्ही जाणले नाही त्यांच्या मागे चालाल,


तू मला अन्याय व अनर्थ का पाहायला लावतोस? नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत; आणि भांडण व वाद उठतो!


एक नियमशास्त्राचा शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.”


आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण श्रमांबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती.


म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ.


ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! आहात कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan