Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परमेश्वरा, तू मला वळवले आणि मी खरच वळलो, तू माझ्यापेक्षा सामर्थी असल्याने तू जिंकलास मी हास्याचे कारण ठरलो आहे. माझा प्रत्येक दिवस चेष्टेने भरलेला असतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 हे परमेश्वरा, तू मला फसवलेस आणि मी फसलो; तू माझ्याहून प्रबळ असल्यामुळे विजयी झालास; मी दिवसभर हसण्याचा विषय झालो आहे; जो तो माझा उपहास करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेह, तुम्ही मला फसविले आणि मी फसलो; तुम्ही माझ्यापेक्षा प्रबळ आहात म्हणून विजयी झालात. मी दिवसभर उपहासाचा विषय झालो आहे; सर्वजण माझी थट्टा करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:7
32 Iomraidhean Croise  

नंतर अलीशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता, लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”


माझ्या शेजाऱ्यांना मी हसण्याचा विषय झालो आहे. ते म्हणतात, त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि त्यास त्याचे उत्तर मिळाले! मी चांगला आणि निष्पाप मानव आहे, पण तरीही ते मला हसतात.


अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात. त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे.


गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही.


परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरुन असे बजावून सांगितले होते की या लोकांच्या मार्गाने जाऊ नको, तो म्हणाला,


माझ्या आई, मला हाय हाय! कारण सर्व पृथ्वीला वाद आणि यूक्तिवादाचा पुरुष असे तू मला जन्म दिला आहे. मला कोणाचे देणे नाही, किंवा त्यांनी मला काही देणे नाही, तरी पण ते सर्व मला शाप देतात.


माझे दुखणे निरंतरचे का आहे, आणि माझी जखम बरी न होणारी का आहे? आटून गेलेल्या दगलबाज झऱ्याप्रमाणे तू मला होशील काय?


मी तर तुझ्यामागे चालून मेंढपाळ होण्यापासून मागे हटलो नाही, तो भयंकर दिवस उजाडावा अशी माझी इच्छाही नव्हती. हे तू जाणतोस, जे माझ्या ओठातून निघाले ते तुझ्यासमोर आहे.


जर मी असे बोललो, मी परमेश्वराबद्दल आता ह्यापुढे विचार करणार नाही, मी त्याचे नाव ह्यापुढे घोषीत करणार नाही. पण त्याचे वचन माझ्या हृदयात, माझ्या हाडांत आग असल्यासारखे होते. म्हणून मी ते समाविष्ट करण्यास संघर्ष करतो परंतु मी त्यामध्ये सक्षम होत नाही.


परमेश्वराने तुला यहोयादाच्या जागी याजक म्हणून नेमले आहे. यासाठी की, परमेश्वराच्या मंदिराचा तू अधिकारी असावे. जो कोणी वेडा होऊन आपणास संदेष्टा करतो, ते सर्व लोक तुझ्या नियंत्रणात आहेत. तू त्यांना खोड्यात अडकवून व बेडी घालावी.


सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “पण जे यहूदी सोडून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते, कारण ते मला त्यांच्या हाती देतील, माझी चेष्टा करतील व मला वाईट वागवतील”


माझ्या स्वजनामध्येच मी चेष्टेचा विषय; प्रतिदिवशी त्यांचे हास्यास्पद गीत झालो आहे.


देवाच्या आत्म्याने मला उंच केले व वर नेले आणि माझ्या आत्म्यात कडवट पण घेऊन आलो, परमेश्वर देवाचा हात सामर्थ्याने माझ्यावर आला!


शासन करण्याचे दिवस येत आहेत, प्रतिफळाचे दिवस येत आहेत, इस्राएल हे जाणणार, तुझ्या महापातकामुळे, वैरभावामुळे आता संदेष्टा मूर्ख बनला आहे.


तो परमेश्वराजवळ विनवणी करू लागला, “हे परमेश्वरा, मी माझ्या देशात होतो तेव्हा माझे सांगणे हेच होते की नाही? म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची घाई केली, कारण मला माहित होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न आहेस. संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहेस.


पण मी तर परमेश्वराच्या आत्म्याकडून पराक्रमाने, चांगुलपणा व सामर्थ्याने परिपूर्ण आहे, ह्यासाठी की याकोबाला त्याचा अपराध व इस्राएलाला, त्याचे पाप दाखवावे.”


मग ते परूशी धनाचे लोभी होते त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी येशूचा तिरस्कार केला.


हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्यास पिलाताकडे परत पाठवले.


तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्याबरोबर कित्येक तत्वज्ञांनी त्यास विरोध केला, कित्येक म्हणाले, “हा बडबड्या काय बोलतो?” दुसरे म्हणाले, “हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो” कारण येशू व पुनरुत्थान ह्याविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे.


तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले, कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.”


किंवा केवळ मला आणि बर्णबाला काम न करण्याचा अधिकार नाही काय?


आणखी दुसर्‍यांनी टवाळक्यांचा व तसाच फटक्यांचा, शिवाय बेड्यांचा व बंदिवासाचा अनुभव घेतला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan