Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मी त्यांना या नगराचे सर्व धन व त्याची सर्व मिळकत व त्याचे सर्व द्रव्ये देईन, म्हणजे यहूदाच्या राजांची सर्व द्रव्ये मी त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन. आणि ते ती लूटतील आणि ती घेऊन बाबेलास जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 नगरातले सर्व निधी, त्यातली सर्व कमाई, त्यातल्या सर्व मोलवान वस्तू व यहूदाच्या राजांची सर्व भांडारे मी त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन, आणि ते ती लुटून बाबेलास घेऊन जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मी या नगरातील सर्व संपत्ती त्यांच्या शत्रूंच्या हातात देईन—सर्व उत्पादन, सर्व जडजवाहीर आणि यहूदीयाच्या राजांचा सर्व खजिना. ते त्यांना लुटतील आणि बाबेलला ते घेऊन जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:5
24 Iomraidhean Croise  

राजा नबुखद्नेस्सरने वर्षारंभी काही सेवक पाठवून यहोयाखीनाला परमेश्वराच्या मंदिरातील बहुमोल खजिन्यासह बाबेलला आणवले. यहोयाखीनाच्या वडिलांचा भाऊ सिद्कीया याला नबखद्नेस्सरने यहूदा व यरूशलेमचा राजा केले.


पाहा, असे दिवस येणार आहेत की, जेव्हा तुझ्या महालातील प्रत्येक गोष्ट, ज्या तुझ्या पूर्वजांनी आतापर्यंत जमविले आहे ते सर्व बाबेलाला घेऊन जातील. काहीच उरणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.


नाश करणारे सर्व वाळवंटातील त्या उजाड ठिकाणाहून आले आहेत, कारण परमेश्वराची तलवार एका सीमेपासून देशाच्या तुसऱ्या सीमेपर्यंत खाऊन टाकीत आहे. कोणत्याही जिवंत प्राण्यांसाठी देशात सुरक्षितता नाही.


मी तुझी संपत्ती आणि धन लूट असे देईन, ही तुमच्या सर्व पापांची किंमत असेल, जे तुम्ही आपल्या सिमांच्या आत केली आहेत.


विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्यांच्या वेद्या ते आठवतात. मी तुझी संपत्ती आणि विपुलता दुसऱ्यास लूट अशी वाटून देणार. कारण तुझी पातके तुझ्या सर्व सिमांत सरळीकडे आहेत.


तरीही लाजेच्या देवाने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्वकाही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली, मेंढ्या व गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे गिळली आहेत.


पाहा! हे नगर काबीज करण्यासाठी वेढे घातले आहेत. कारण तलवार, दुष्काळ आणि मरी, यामुळे हे नगर जे खास्दी त्याविरूद्ध लढाई करतात त्यांच्या हाती देण्यात आले आहे. कारण तू जे काही बोललास ते घडले आहे. आणि पाहा, ते तू पाहिले आहे.


सिद्कीयाच्या अकराव्या वर्षाच्या आणि चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरूशलेमेच्या तटबंदीला भगदाड पडले.


नंतर खास्द्यांनी राजाच्या घराला व लोकांच्या घरांना आग लावली. त्यांनी यरूशलेमेची तटबंदी फोडली.


अरिष्टामागून अरिष्ट घोषीत करण्यात आले आहे. कारण संपूर्ण देशाचा नाश झाला आहे. एकाएकी त्यांनी माझ्या तंबूचा व कनातींचा नाश केला आहे.


तिच्या सर्व मौल्यवान खजिन्यावर शत्रूंनी आपला हात ठेवला आहे. परकीय राष्ट्रांनी तुझ्या सभास्थानात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस तरीही, तिने त्यांना तिच्या पवित्रस्थानात जाताना पाहिले आहे.


यरूशलेम आपल्या कष्टाच्या व बेघर होण्याच्या दिवसात, पूर्वी तिच्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टीं आठवते. तिच्या लोकांस वैऱ्यांनी पकडले आणि तिला मदत करणारे कोणीही नव्हते. तिच्या शत्रूंनी तिला पाहिले व तिच्या ओसाडपणात तिच्यावर हसले.


पृथ्वीवरील राजांचा व पृथ्वीवरील राहणाऱ्यांचा ह्यावर विश्वास बसला नाही की, यरूशलेमेच्या प्रवेशद्वारांतून शत्रू किंवा वैरी वेशींत शिरतील.


तुझ्यामध्ये असलेल्या संदेष्टयांच्या विरुध्द कारस्थान तुझ्यात आहे, जसा गर्जना करणारा सिंह आपल्या भक्षाला फाडून टाकतो, ते जीवन संपवून टाकतो आणि त्याने तिच्यात अनेकांना विधवा बनवले.


परमेश्वराने नबुखद्रेनेस्सर राजास यहूदाचा राजा यहोयाकीमवर विजय दिला आणि त्यास परमेश्वराच्या घरातील काही वस्तू दिल्या त्याने त्या शिनार येथे त्याच्या देवाच्या घरासाठी आणल्या आणि त्या पवित्र वस्तू त्याने त्याच्या देवाच्या भांडारात ठेवल्या.


एफ्राईम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला, तरी पूर्वेचा वारा येईल, परमेश्वराचा वारा रानातून येईल एफ्राईमाचा झरा सुकून जाईल, त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही. त्यांचा शत्रू त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan