Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 20:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 म्हणून पशहूराने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व परमेश्वराच्या मंदिरात, बन्यामीनच्या वरच्या प्रवेशद्वाराच्या खोड्यात त्यास घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा पशहूराने यिर्मया संदेष्ट्याला फटके मारले आणि परमेश्वराच्या मंदिरातील वरल्या बाजूस बन्यामीनद्वारात खोडे होते त्यांत त्याला अडकवून ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 पशहूराने यिर्मयाह संदेष्ट्याला पकडून फटके मारविले आणि याहवेहच्या मंदिराजवळच्या बिन्यामीन दरवाजाजवळ खोड्यात अडकवून ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 20:2
30 Iomraidhean Croise  

राजाने जेव्हा देवाच्या मनुष्याचे हे वेदीबद्दलचे बोलणे बेथेल येथे ऐकले. तेव्हा यराबामाने वेदीवरील आपला हात उचलून त्या मनुष्याकडे निर्देश करत म्हटले, “पकडा त्याला” मग ज्या हाताने त्याने त्या मनुष्याकडे निर्देश केला होता तो हे बोलत असताना लुळा पडला. त्यास तो हलवता येईना


आणि त्यांना जाऊन सांगा, राजा म्हणतो, या मनुष्यांस बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्यास फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत सुखरूप येईपर्यंत त्यास तिथेच राहू द्या.”


द्रष्ट्याच्या या बोलण्याचा आसास राग आला व क्रोधाच्या भरात त्याने त्यास तुरुंगात डांबले. याच काळात आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागला.


तेवढ्यात कनानाचा पुत्र सिदकीयाने पुढे होऊन मीखायाच्या थोबाडीत मारले. तो म्हणाला, “मीखाया, मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला गेला तो कोणत्या दिशेने?”


पण लोकांनी जखऱ्याविरुध्द कट केला. राजाने लोकांस जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्यास दगडफेक करून मारले. हे त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनातच केले.


तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस. माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस, माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस.


देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’


ते सर्व लोक तुझ्याविरूद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करणार नाहीत, कारण तुला सोडवायला मी तुझ्याबरोबर आहे, परमेश्वर असे म्हणतो.”


यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिकत कळली, म्हणून ते राज्याचा घरातून बाहेर आले व वरती परमेश्वराच्या मंदिरात गेले. तेथे ते परमेश्वराच्या मंदिरात नव्या प्रवेशद्वाराजवळ स्थानांवर बसले.


परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे, यिर्मयाने, परमेश्वराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगितली, नंतर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि लोकांनी यिर्मयाला धरले. ते म्हणाले, तू खचित मरशील!


परमेश्वराने तुला यहोयादाच्या जागी याजक म्हणून नेमले आहे. यासाठी की, परमेश्वराच्या मंदिराचा तू अधिकारी असावे. जो कोणी वेडा होऊन आपणास संदेष्टा करतो, ते सर्व लोक तुझ्या नियंत्रणात आहेत. तू त्यांना खोड्यात अडकवून व बेडी घालावी.


यहोयाकीम राजाने लेखक बारूखाला व यिर्मया संदेष्ट्याला अटक करण्यासाठी हम्मेलेखाचा मुलगा यरहमेल व अज्रीएलाचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या यांना आज्ञा केली. पण त्यांना परमेश्वराने लपविले होते.


तो जसा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहताच, तेथे पहारेकऱ्यांचा प्रमुख होता. तेव्हा हनन्याचा मुलगा शलेम्या याचा मुलगा इरीया त्याचे नाव होते. त्याने यिर्मया संदेष्ट्याला धरले व म्हणाला, “तू फितून खास्द्यांकडे जात आहेस.”


म्हणून सिद्कीया राजाने हुकूम दिला. त्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणात ठेवले. नगरातील सर्व भाकर संपेपर्यंत त्यास रस्त्यावरील रोटीवाल्याकडून भाकर द्यावी. अशा रीतीने यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात राहिला.


तेव्हा सर्व देश यरूशलेमेच्या दक्षिणेस असलेली गिबा ते रिम्मोन ह्यांमधील अराबाप्रमाणे होईल; यरूशलेम मात्र पुन्हा उभारले जाईल; अगदी बन्यामीनच्या प्रवेशद्वारापासून ते पाहिल्या प्रवेशद्वारापर्यंत आणि हनानेलच्या मनोऱ्यापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत; अशी ती आपल्या स्थळी वसेल.


परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या चाकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले.


तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना बंदिशाळेत ठेवले.


आणि त्यांनी आपले हात प्रेषितांवर टाकून त्यांना सार्वजनिक बंदिशाळेत ठेवले.


तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले, त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका असे निक्षून सांगून त्यांना सोडून दिले.


ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरूषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्यास धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात.


आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्रजनांच्या रक्ताने व येशूसाठी हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो.


जे दुःख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो, सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुम्हास जीवनाचा मुकुट जे आनंत जीवन आहे ते देईन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan