Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “जा आणि यरूशलेमेच्या कानामध्ये अशी घोषणा कर, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्याविषयी तुझ्या तरूणपणाची निष्ठा, तुझ्या वाडनिश्चयाची प्रिती, जेव्हा तुम्ही वाळवंटातून आणि पडीत जमिनीतून माझ्यामागे आलात, हे माझ्या ध्यानात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “जा, हे पुकारून यरुशलेमेच्या कानी पाड : परमेश्वर असे म्हणतो की, तुझे तारुण्यातले प्रेम, वाङ्निश्‍चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे ह्यांचे मला स्मरण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “जा आणि यरुशलेमच्या लोकांस याची घोषणा कर: “याहवेह असे म्हणतात: “ ‘मला आठवण आहे, मला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एखाद्या नववधूप्रमाणे मजवर कशी प्रीती केली. आणि रानात व पेरणीरहित भूमीत देखील मला अनुसरला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:2
39 Iomraidhean Croise  

इस्राएलाने आता म्हणावे की, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.


परमेश्वराने मिसऱ्यांना आपला प्रबळ हात दाखविला तो इस्राएल लोकांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला.


आणि मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हास संध्याकाळी मांस खावयास देईल; आणि सकाळी पोटभर भाकरी देईल; कारण तुम्ही परमेश्वराविरूद्ध कुरकुर करीत आहा ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहो? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुध्द नाही तर परमेश्वराविरुध्द आहे.”


ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, ते उघड्या जागेवर आपली वाणी उच्चारते;


(ती स्त्री यरूशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा. त्या दिवशी तो खूप आनंदी होता.


(ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने अशी धुराच्या खांबासारखी, रानातून येणारी ती ही कोण आहे?


गळा काढून रड, दम धरू नको, रणशिंगाप्रमाणे तुझा आवाज मोठा कर. माझ्या लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांग आणि याकोबाच्या घराण्यास त्यांची पापे दाखव.


परमेश्वर मला म्हणाला, “यहूदाच्या शहरांतून व यरूशलेमेच्या रस्त्यांतून हे वचन घोषीत कर, कराराची वचने ऐका आणि त्यांचे पालन करा.


नंतर बेन हिन्नोमाच्या मुलाचे खोरे जे कुंभाराच्या वाड्याच्या वेशीजवळ आहे तेथे जा, आणि मी तुला सांगतो ती वचने तिथे घोषीत कर.


परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,


कारण ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्याने आम्हास मिसरहून आणले, तो परमेश्वर कोठे आहे? ज्याने आम्हांला रानांतून पार नेले, ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून, काळोख व धोका असलेल्या निर्जल देशातून, जेथून कोणीही प्रवास करीत नाही अशा प्रदेशातून आम्हांला पार नेले. तो परमेश्वर कोठे आहे?”


माझ्या बापा, मी तरूण असताना तुच माझा जवळचा मित्र आहेस. असे आतापासून तू मला म्हणणार नाही काय.


यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दारात उभा राहा आणि हे वचन घोषीत कर! “हे यहूदातील लोकहो, जे तुम्ही सर्व परमेश्वराची उपासना करायला या दारातून आत जाता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका!


तुझे सर्व किळसवाणे व वेश्याकर्म तू कुमारी असतांना नग्न होऊन रक्तात लोळत होती याचे स्मरण तुला झाले नाही.


तुझ्या तरुणपणात केलेल्या माझ्या कराराचे मी सर्वदा स्मरण करीन आणि मी सर्व काही कराराच्या द्वारे स्थापीत करेन.


मी पुन्हा तुझ्या जवळून गेलो, तेव्हा वेळ तुझ्या प्रेमाच्या विकासाची होती, तेव्हा मी तुझ्यावर पांघरुन घालून तुझी नग्नता झाकली. मग मी शपथ वाहून तुझ्याशी करार केला. परमेश्वर देव म्हणतो, या कराराने तू माझी झाली आहेस.


मग तिने आपल्या व्यभिचाऱ्याच्या कारवाया अधिक वाढवल्या आहेत, तिला तिचे स्मरण होऊन तिने व्यभिचार अधिक वाढवला, जेव्हा तिने मिसरात आपला व्यभिचाराचा स्वभाव ठेवला.


त्यांनी आपल्या तारुण्याच्या दिवसात मिसरात वेश्या कर्म केले. त्यांची स्तने चुरली व कुमारी असतांना त्यांच्या छातीला गोंजारण्यात आले.


तिने मिसरात कुठलाही वेश्याकर्म मागे ठेवला नाही, जेव्हा ती कुमारी होती तेव्हा ते तिच्या सोबत झोपले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा तिच्या कुमारीपणात स्तनांना दाबले त्यांनी पहिल्यांना तिच्या सोबत संभोग केला.


जेव्हा इस्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले, आणि माझ्या पुत्राला मिसरातून बोलावले.


मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आशेचे दार म्हणून अखोरचे खोरे देईन. तेव्हा ती मला उत्तर देईल, जसे तिने आपल्या तरुणपणी दिले होते, जेव्हा ती मिसर देशातून आली होती.


कारण मी तिच्या मुखातून बआलाची नावे काढून टाकेन, व तिला त्यांची नावे त्यानंतर आठवली जाणार नाही.


ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल पण ती त्यांना गाठू शकणार नाही, ती त्यांचा शोध करेल पण ते तिला सापडणार नाही. मग ती म्हणेल, मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल, कारण माझी दशा आतापेक्षा तेव्हा चांगली होती.


“मुखाला तुतारी लाव, परमेश्वराच्या, घरावर गरुड येत आहे, हे यासाठी घडत आहे कारण लोकांनी माझा करार मोडून माझ्या नियम शास्त्राच्या विरोधात बंड केले आहे.


परमेश्वर म्हणतो, मला इस्राएल जेव्हा आढळला तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता, अंजीराच्या हंगामातल्या प्रथम फळासारखे तुमचे पुर्वज मला आढळले पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले ते त्यांच्या मूर्तीसारखे घृणास्पद झाले.


“ऊठ, व त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि तिकडे जाऊन त्याच्याविरुध्द आरोळी कर; कारण त्यांची दुष्टता मजसमोर वर आली आहे.”


ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.


नंतर लोकसमुदायातील एकजण त्यास म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा!”


तुमच्या हातच्या सर्व कार्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास आशीर्वादीत केले आहे. तुमच्या या रानातील वाटचालीकडे त्याचे लक्ष आहे. गेली चाळीस वर्षे तुमचा देव परमेश्वर तुमच्या सोबत राहीला आहे. तुम्हास कशाचीही वाण पडली नाही.’


परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरेच फार प्रेम आहे. त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे. ते लोक त्याच्या पायाशी बसून त्याच्याकडून शिकवण घेतात.


तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हास रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहत होता. तुम्हास नम्र करावे, तुमच्या अंत:करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले.


हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.


तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan