Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 2:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 कारण माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत. जो मी जिवंत पाण्याचा झरा त्या मला सोडून त्यांनी आपणासांठी हौद, फुकटे हौद ज्याच्याने काही पाणी धरवून ठेववत नाही ते खोदले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले; मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यांत पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत: त्यांनी जीवनदायी पाण्याच्या झर्‍याला, म्हणजे मला, सोडले आहे, आणि ज्यात पाणी राहत नाही असे फुटके, गळके हौद स्वतःसाठी बांधले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 2:13
49 Iomraidhean Croise  

यहूदाच्या लोकांनी माझा त्याग केला. इतर दैवतांपुढे त्यांनी धूप जाळला. त्यांनी मला संताप आणला, त्यांनी अनेक मूर्तींही केल्या. म्हणून या प्रदेशावर माझा राग आहे. न विझवता येणाऱ्या अग्नीसारखा माझा संताप असेल.


कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू.


भूतलावर जी काही कामे चालतात ती मी पाहिली आणि पाहा, ते सर्व वायफळ आहेत आणि वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे ते आहे.


शिक्षक हे म्हणतो, धुक्याच्या वाफेसारखी, वाऱ्यातील झुळूकेसारखी प्रत्येक गोष्ट नाहीशी होईल, पुष्कळ प्रश्न मागे ठेवून जातील.


उपदेशक म्हणतो, धुक्याची वाफ, प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी वाफ आहे.


नंतर मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे जी मी पार पाडली होती, आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे पाहिले, परंतु पुन्हा सर्वकाही व्यर्थ होते आणि वायफळ प्रयत्न करणे असे होते; भूतलावर त्यामध्ये तेथे काही लाभ नाही.


कारण ज्याचे श्रम ज्ञानाने, विद्येने आणि कौशल्याने होतात असा मनुष्य कोण आहे? तरी त्यासाठी ज्याने काही श्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेऊन सोडून जावे हेही व्यर्थच आहे आणि मोठी शोकांतिका आहे.


जो मनुष्य देवासमोर चांगला आहे त्यास तो ज्ञान, विद्या आणि आनंद देतो. परंतु तो पाप्याला कष्ट देतो, अशासाठी की त्याने संग्रह करावा व साठवून ठेवावे आणि जो देवासमोर चांगला आहे त्यास ते द्यावे. हेही व्यर्थ आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.


नंतर मी पाहिले की, सर्व कष्ट व कारागिरीचे प्रत्येक काम असे आहे की, त्यामुळे त्याचा शेजारी त्याचा हेवा करतो. हेही व्यर्थ आहे व हे वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.


बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, इस्राएलास समजत नाही.”


अहाहा! हे राष्ट्र, पापी, दुष्कृत्यांच्या भाराने खाली दबलेले लोक, दुष्ट जनांची संतती, भ्रष्टाचाराने वागणारी मुले! त्यांनी परमेश्वरास सोडून दिले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरास त्यांनी तुच्छ लेखले आहे. त्यांनी स्वतःस त्याच्यापासून दूर केले आहे.


तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल.


यास्तव माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे पाडावपणांत गेले आहेत, त्यांचे अधिकारी भुकेले आहेत आणि त्यांच्या समुदायाला पिण्यास पाणी नाही.


जी भाकर नव्हे तिच्यासाठी तुम्ही चांदी का तोलून देता? आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि जे चांगले आहे ते खा व मिष्टान्नात तुमचे जीवन आनंदीत होवो.


कारण तो म्हणाला, खचित हे माझे लोक आहेत, मुले, जी विश्वासघातकी नाहीत. म्हणून तो त्यांचा त्राता झाला.


आणि मी त्यांच्याविरुद्ध माझा निर्णय घोषित करीन, कारण त्यांनी मला सोडून इतर देवतांपुढे धूप जाळला, आणि आपल्या हातांच्या कामांची पूजा केली, या त्यांच्या दुष्टाईबद्दल मी त्यांच्याविरुद्ध शिक्षा सांगेन.


त्यांचे थोरजन त्यांच्या चाकरांना पाण्यासाठी पाठवतात, ते सर्व अयशस्वी परत येतात, म्हणून ते लज्जित व फजीत होऊन आपले चेहरे झाकून घेतात.


तू मला नाकारलेस, परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यापासून मागे गेली आहेस. म्हणून मी माझ्या हाताने तुला फटकारील आणि नाश करीन. तुझ्यावर दया करून मी थकलो आहे.


परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो या भूमीवर परमेश्वरा पासून फिरेल, त्यास छेदले जाईल. कारण त्यांनी परमेश्वरास जो जिवंत पाण्याचा झरा आहे, त्यास सोडले आहे.


लबानोन पर्वतांवरचे बर्फ शिखरावरील खडकाला कधी सोडील काय? दूर पर्वतातून वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी कधी आटेल काय?


मी असे करणार कारण त्यांनी मला सोडले आणि हे ठिकाण विटाळवीले आहे. माहित नसलेल्या अशा परक्या दैवतांना त्यांनी या ठिकाणी जागा दिली. त्यांनी व त्यांच्या पुर्वजांनी आणि यहूदाच्या राजांनी हे ठिकाण निष्पाप रक्ताने भरले आहे.


काय राष्ट्रांनी देवांची अदलाबदली केली, जरी ते देव नसले तरी? पण माझ्या लोकांनी जे काही मदत करू शकत नाही त्याच्याशी आपल्या वैभवाची अदलाबदली केली आहे.


तुम्ही स्वत: ला तसे केले नाही काय? जेव्हा परमेश्वर तुमचा देव तुम्हास योग्य मार्गाने घेऊन जात होता, तेव्हा तुम्हीच त्यास सोडले.


चोराला लोकांनी पकडताच तो तसा लज्जीत होतो, त्याचप्रमाणे इस्राएलाचे घराने लाजले आहे. ते, त्यांचे राजे आणि त्यांचे अधिकारी, याजक आणि संदेष्टे लज्जित झाले आहेत.


कारण देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख लोक आहेत आणि त्यांना काहीएक समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण चांगले करायचे त्यांना ज्ञान नाही.”


कारण माझ्या लोकात काही दुष्ट मनुष्य आढळतात. दबा धरणाऱ्या फासेपारध्यांप्रमाणे ते एखद्यावर नजर ठेवतात. ते जाळे पसरतात आणि लोकांस पकडतात.


भविष्यवादी खोटेपणाने भविष्य सांगतात, आणि याजक त्यांच्या शक्तीने अधिकार गाजवतात. ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांस हे प्रिय आहे! पण शेवटी काय होणार?”


मी इस्राएल घराण्याला परत माघारी आणिन, कारण त्यांच्या मूर्तीपुढे त्यांनी मला अगदी परके केले आहे, असे परमेश्वर देव म्हणतो.


मग त्या मनुष्याने मला पुन्हा मंदिराच्या प्रवेशदाराकडे नेले आणि पाहा! मंदिराच्या उंबरठ्याखालून पाणी पूर्वेकडे वाहत होते, कारण मंदिराचे तोंड पूर्वेला होते. आणि मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस पाणी वाहात होते.


तरीसुद्धा माझे लोक शत्रूसारखे उभे राहिले आहेत. ज्यांना युद्ध आवडत नाही, असे सहज जवळून जात असता तुम्ही अंगरख्यावरून घातलेला त्यांचा झगा काढून घेता.


“माझ्या लोकांनो, मी काय केले? मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा? माझ्या विरुद्ध साक्ष दे.


त्या दिवसात दावीदाच्या वंशासाठी आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या इतर लोकांसाठी पापे धुण्यासाठी आणि त्यांना शुध्द करण्यासाठी पाण्याचा नवा झरा फुटेल.


येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला समजले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”


ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, पाणी काढायला आपल्याजवळ काही नाही व विहीर तर खोल आहे, मग आपल्याजवळ ते जिवंत पाणी कोठून?


परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्यास कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्यास देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”


मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आता लवकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून ते वेश्येसमान त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील.”


ते पाणी नसलेले झरे आहेत, ते वार्‍याने विखरलेले ढग आहेत आणि अंधाराचा गडद काळोख त्यांच्यासाठी राखलेला आहे.


आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन.


नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती.


आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये,” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये,” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.


तरी तुम्ही मला सोडून दुसऱ्या देवांची उपासना केली; यास्तव मी यापुढे तुमचा बचाव करणार नाही.


तेव्हा ते परमेश्वरास हाक मारून म्हणाले, आम्ही पाप केले आहे, कारण आम्ही परमेश्वरास सोडून बआल आणि अष्टारोथ या मुर्तींची सेवा केली आहे. परंतु आता तू आमच्या शत्रूच्या हातातून आम्हास सोडीव म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.


Lean sinn:

Sanasan


Sanasan