Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 19:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 या नगरीचा मी पूर्णपणे नाश करीन. यरूशलेम जवळून जाताना लोक तिच्या पीडा पाहून माना हलवतील व फुत्कार सोडतील, मी त्या नगरीला नाश आणि फुत्काराची गोष्ट अशी करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी हे नगर विस्मय व उपहास ह्यांना पात्र करीन; त्यावर झालेल्या सर्व आघातांमुळे त्याच्याजवळून जाणारा-येणारा प्रत्येक जण विस्मित होऊन उपहास करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी या नगराचा नाश करेन आणि ते दहशतीचे व आणि घृणेचे ठिकाण बनवीन; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 19:8
14 Iomraidhean Croise  

हे मंदिर नामशेष होईल; ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचे असे का केले बरे?’


यास्तव जे राष्ट्र भयानक आणि सर्वकाळासाठी फुत्काराची गोष्ट असा होईल. तिच्याजवळून जाणारा प्रत्येक हादरेल आणि आपले डोके हालवेल.


यरूशलेम, यहूदा शहर आणि तिच्यातील राजे आणि नेते यांना मी तो प्याला दिला, म्हणजे वैराण, विस्मय व वाळवंट, आणि फुत्कार व शाप असे होतील.


परमेश्वर म्हणतो, “कारण मी आपलीच शपथ वाहिली आहे की, बस्रा दहशत, निंदा, उध्वस्त, आणि शापासाठीचा विषय होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. त्यांची सर्व नगरे कायमची उध्वस्त होतील.”


परमेश्वराच्या क्रोधामुळे बाबेलात वस्ती होणार नाही, परंतु संपूर्ण उध्वस्त होईल. बाबेला शेजारून जो कोणी जाईल तो प्रत्येकजण तिच्यामुळे कंप पावेल आणि तिच्या सर्व जखमामुळे फूत्कार टाकेल.


लोकांतले व्यापारी तुझा तिरस्कार करतात; तू दहशत अशी झाली आहेस आणि तू पुन्हा कधीच असणार नाहीस.”


मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील.


कारण अम्रीचे नियम पाळले जातात आणि अहाबाच्या घराण्याची सर्व कार्ये करण्यात येतात. तुम्ही त्यांच्या मसलती प्रमाणे चालता, म्हणून मी तुझा व तुझ्या शहराचा नाश करीन व त्याच्या रहिवाशांचा उपहास होईल आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हास सोसावी लागेल.


जी नगरी आधी हर्षात व भीती शिवाय जगत होती, आणि आपल्या मनात म्हणत होती की, मीच आहे आणि माझ्याबरोबरीची दुसरी कोणीच नाही, तीच ही आहे. ती आता कशी ओसाड व वनपशू बसण्याचे स्थान अशी झाली आहे! आणि तिच्याजवळून जाणारा येणारा प्रत्येकजण फुसफुसणार व आपला हात हलवणार!


आणि ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हास नेईल तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा, म्हणीचा तुम्ही विषय व्हाल.


या देशाचा कसा नाश झाला हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती याप्रकारे परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan