Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 19:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 ‘यरूशलेममधील घरे आणि यहूदातील राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. कारण त्यांनी आपल्या सर्व विटाळलेल्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि दैवतांना त्यांनी पेयार्पणे केली.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ज्या सर्व घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील सर्व सेनांना धूप जाळला व अन्य देवांना पेयार्पणे अर्पण केली ती यरुशलेमेतील घरे व यहूदाच्या राजांची घरे तोफेताच्या स्थळाप्रमाणे अशुद्ध होतील.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 19:13
19 Iomraidhean Croise  

आणि त्यांनी परमेश्वर आपला देव याच्या सर्व आज्ञा सोडून, त्यांनी वासरांच्या दोन मूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आणि आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बआलदेवतेची त्यांनी पूजा केली.


हिन्नोमच्या मुलाचे खोरे याठिकाणी तोफेत हे एक ठिकाण होते. तेथे लोक मोलख या दैवताला आपल्या मुलांचा बली देत आणि वेदीवर त्यांना जाळत. योशीयाने हे स्थान पुन्हा वापरता येऊ नये असे भ्रष्ट करून टाकले.


आहाजच्या इमारतीच्या गच्चीत पूर्वी यहूदाच्या राजांनी वेद्या बांधल्या होत्या. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकातही मनश्शेने वेद्या बांधल्या होत्या. योशीयाने या सर्व वेद्यांची मोडतोड करून किद्रोनच्या खोऱ्यात त्यांचे भग्नावशेष टाकून दिले.


त्याने सर्वच्या सर्व स्मृतीस्तंभ आणि अशेराचे खांब यांची पार मोडतोड केली आणि त्या ठिकाणावर मृत मनुष्यांच्या अस्थी पसरुन टाकल्या.


त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली; जेथे तू राहतो त्याचे पावित्र्य भ्रष्ट केले, धुळीस मिळविले.


हे देवा, परकी राष्ट्रे तुझ्या वतनात शिरली आहेत; त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; त्यांनी यरूशलेमेचे ढिगारे केले आहेत.


दृष्टांताच्या खोऱ्याविषयी ही देववाणी; तुम्ही सर्व घरच्या माळीवर जात आहा, त्याचे काय कारण आहे?


परमेश्वर असे म्हणतो, हे ठिकाण आणि त्यातील राहणारे, ज्यांच्या बाबतीत मी असेच करीन. मी या नगरीला तोफेतप्रमाणे करीन.


आणि जे खास्दी या नगराविरूद्ध लढाई करतात ते येतील व हे नगर अग्नीने पेटवतील व मला संतापविण्यासाठी ज्या घराच्या धाब्यावर बआलदेवाला धूप जाळला आणि इतर देवांना पेयार्पणे ओतली तिही जाळून टाकतील.


जेव्हा आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतणे यापासून परावृत्त झालो तेव्हापासून आम्ही सर्व दारिद्र्याने दुःखी आहोत व तलवारीने व दुष्काळाने मरत आहोत.”


त्याने परमेश्वराचे घर जाळले, राजवाडा व यरूशलेमेमधील सर्व घरेही जाळली. नगरातील प्रत्येक महत्वाची इमारतसुद्धा त्याने जाळून टाकली.


मला संताप आणावा म्हणून मुले लाकडे गोळा करत आहेत आणि वडील सरपण पेटवत आहे. स्त्रिया आकाशाच्या राणीसाठी कणीक मळत आहे आणि इतर दैवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेयार्पणे ओतत आहेत.


आणि चंद्र, सूर्य, आकाशातले तारे, ज्यांना ते अनुसरले आणि सेवा केली, ज्यांच्या ते मागे चालले आणि पूजन केले, त्यांच्यापुढे पसरतील, ती गोळा केल्या जाणार नाही किंवा पुरल्या जाणार नाही, ती पृथ्वीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील.


मी आपले हाथ उंचावून शपथ घेऊन दिलेल्या देशात मी त्यांना आणिले, तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी आणि दाट छायेचे वृक्ष पाहून मला संतापावण्यासाठी तेथे त्यांनी यज्ञबली अर्पिली. तेथे त्यांनी सुवासीक धुप जाळीला व पेयार्पण अर्पिली.


जे घरावर स्वर्गातल्या सैन्यांचे भजन करतात ते, जे आणि परमेश्वराचे भजन करतात व त्याची शपथ घेतात व आपल्या मिल्कोमाची ही शपथ वाहतात,


दुसऱ्या दिवशीही माणसे यापो गावाजवळ आली, ती दुपारची वेळ होती, त्याचवेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला.


तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहीले आहे ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केलेत काय?


तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहाताना हबकून जावू नका. त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करु नका. या गोष्टी तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांस देऊन ठेवल्या आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan