यिर्मया 17:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी दिलेला वारसा तू गमावशील. मी तुमच्या शत्रूंना तुम्हास गुलाम म्हणून अज्ञान भूमीत देईन. कारण माझ्या क्रोधात तू अग्नी पेटवला आहे, जो सर्वकाळ जळत राहीन.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी तुला जे वतन दिले ते तुझ्या हातचे जाईल; तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करशील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी तुम्ही भडकवला आहे. तो सर्वकाळ जळत राहील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुमच्याच चुकीमुळे मी तुम्हास दिलेले वतन तुम्ही घालवाल. तुमच्या शत्रूंकडे, तुम्हाला माहीत नसलेल्या राष्ट्रांत मी तुम्हाला गुलाम म्हणून पाठवेन. कारण तुम्ही माझा क्रोधाग्नी पेटविला आहे आणि तो सतत जळत राहील.” Faic an caibideil |
म्हणून परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे, आणि त्याने आपला हात, त्यांच्यावर उगारून त्यांना शिक्षा केली आहे. डोंगरसुध्दा भीतीने कापले आहेत आणि त्यांची मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडली आहेत. हे सर्व असूनही देवाचा राग शांत झाला नाही, पण त्याचा हात लोकांस शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.
हे असे घडणार, जेव्हा तू, इस्राएल आणि यहूदा असे म्हणेल की, आपल्या परमेश्वर देवाने आम्हासोबत या सर्व गोष्टी का केल्या? तेव्हा यिर्मया तू त्यांना असे म्हण, ‘ज्याप्रकारे तुम्ही परमेश्वरास सोडून आपल्या देशात परक्या देवांची सेवा केली, त्याचप्रकारे जो राष्ट्र तुमचा नाही त्यामध्ये तुम्ही परक्यांची सेवा कराल.”