Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 16:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 परमेश्वर असे म्हणतो, पाहा! लवकरच मी पुष्कळ मासे धरणाऱ्यांना पाठवीन. म्हणजे ते लोकांस मासे धरल्यासारखे पकडतील. त्यानंतर पुष्कळ शिकाऱ्यांना पाठवीन म्हणजे ते प्रत्येक डोंगर, टेकड्या व कपारी यांमधून त्यांची शिकार करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परमेश्वर म्हणतो, पाहा, मी पुष्कळ पाग टाकणार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते त्यांना पाग टाकून पकडतील; नंतर मी पुष्कळ शिकार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून व खडकांच्या कपारींतून त्यांना हुसकून काढून त्यांची शिकार करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “परंतु आता मी अनेक मासे पकडणारे पाठवेन,” याहवेह अशी घोषणा करतात, “व ते त्यांना पकडतील. त्यानंतर मी शिकार्‍यांना पाठवेन, आणि ते प्रत्येक पर्वतातून, डोंगरातून आणि खडकाच्या कपारीतून त्यांचा शोध घेऊन त्यांची शिकार करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 16:16
21 Iomraidhean Croise  

तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे “निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी” अशी म्हण पडली आहे.


जेव्हा परमेश्वर पृथ्वीला घाबरून सोडण्यास उठेल, तेव्हा परमेश्वराच्या भयावह कृतीमुळे व त्याच्या तेजामुळे लोक खडकाच्या गुहेत व जीर्ण होऊन फुटलेल्या खडकाच्या कपारीत शिरतील.


त्या सगळ्या खोऱ्यात व खडकाच्या कपारीत सगळ्या काटेरी झुडपात व सर्व कुरणांत तळ देतील.


म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, या देशाविरूद्ध आणि त्यातील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध, तुझ्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध बोलावून घेईन. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी त्यांना नाश करण्यासाठी ठेवीण. आणि त्यांना विस्मय व फूत्कार व सर्व काळ ओसाड असे करीन.


प्रत्येक शहर स्वर व धनुर्धारी यांच्या आवाजाने पळून जातील, ते जंगलात पळून जातील. प्रत्येक शहर डोंगरकड्याच्या ठिकाणी चढेल. शहरे ओसाड पडतील, कारण तेथे कोणीही राहणारे नसतील.


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, मी तुझ्यावर दहशत आणीन. ही दहशत जे कोणी तुझ्या सभोवताली आहेत त्यांच्या सर्वांपासून येईल. तुमच्यातला प्रत्येकजण त्यांच्यापुढे विखरला जाईल. तेथे पळून जाणाऱ्यांना एकत्र जमवायला कोणी असणार नाही.”


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “ते इस्राएलाचे शेष उरलेल्या द्राक्षांसारखे वेचून काढतील, तू आपला हात द्राक्षे खुडणाऱ्याप्रमाणे डाहाळ्यातून फिरव.”


आमच्या शत्रूंनी आमची शिकार केली आणि आम्ही रस्त्यांवरसुध्दा जाऊ शकलो नाही. आमचा शेवट जवळ आला! आमचे आयुष्य सरले होते! आमचा अंत आला आहे!


आमचा पाठलाग करणारे गरुडापेक्षाही वेगवान होते. त्यांनी आमचा डोंगरांत पाठलाग केला. आम्हास पकडण्यासाठी ते रानात दडून बसले.


मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन, त्यांच्या विरोधात राष्ट्रे एकत्र येतील व त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकतील.


परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की, पाहा, ते तुम्हास आकड्यांनी, आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील, असे दिवस तुम्हावर येतील.


जणू काय एखादा मनुष्य सिंहापासून दूर पळून गेला आणि अस्वलाने त्यास गाठले, अथवा घरात जाऊन त्याने भिंतीवर हात ठेवला आणि त्यास साप चावाला.


धार्मिक मनुष्य पृथ्वीवरून नष्ट झाला आहे, आणि मनुष्यांमध्ये कोणीही सरळ नाही; ते सर्व रक्त पाडायला टपतात; ते प्रत्येकजण जाळे घेऊन आपल्या भावाची शिकार करतात.


“तेव्हा मी एक दिवा घेऊन यरूशलेमेतून शोध करीन, जे खाली गाळ असलेल्या द्राक्षरसासारखे स्वस्थ बसले आहेत, त्यांना मी शिक्षा करीन. ते आपल्या मनात असे बोलतात, ‘परमेश्वर काहीही चांगले किंवा वाईट करणार नाही.’


आणखी माझ्या बापा, पाहा माझ्या हातात तुमच्या वस्त्राचा काठ आहे तो पाहा. कारण मी तुमच्या वस्त्राचा काठ कापला आणि तुम्हास जिवे मारले नाही. यावरुन माझ्या ठायी दुष्टाई किंवा फितूरी नाही आणि जरी तुम्ही माझा जीव घ्यायला पहाता, तरी मी तुमच्याविरुध्द पाप केले नाही, याची खात्री करून पाहा.


तर आता माझे रक्त परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर भूमीवर पडू नये; कारण जसा कोणी डोंगरावर तितराची शिकार करतो तसा, एका पिसवेचा शोध करण्यास इस्राएलाचा राजा निघून आला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan