Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 16:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि मग असे होईल, तू ही वचने या लोकांस सांगशील आणि ते तुला म्हणतील, परमेश्वराने आमच्याबद्दल या भयंकर गोष्टी का सांगितल्या? आम्ही काय चूक केली? आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध काय पाप केले?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तू ह्या लोकांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या म्हणजे ते तुला विचारतील, ‘परमेश्वराने हे सर्व मोठे अरिष्ट आमच्यावर येईल असे का सांगितले? परमेश्वर आमचा देव ह्याच्याविरुद्ध आम्ही कोणता अपराध, कोणते पातक केले आहे?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “हे सर्व तू लोकांना सांगशील, तेव्हा ते विचारतील, ‘याहवेहने ही भयानक संकटे आमच्यावर पाठविण्याचा हुकूम का दिला आहे? आम्ही कोणती चूक केली आहे? आमच्या याहवेह परमेश्वराच्या विरुद्ध आम्ही असे कोणते पाप केले आहे?’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 16:10
11 Iomraidhean Croise  

कारण सेनाधीश परमेश्वर, ज्याने तुला लावले आहे, तो तुझ्या विरूद्ध अरिष्ट बोलला आहे. कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली. त्यांनी ‘बाल’ देवाला यज्ञ अर्पण केले म्हणून मला राग आला.”


तेव्हा तू कदाचित् स्वत:च्या मनास विचारशील, “माझ्या सोबतच या गोष्टी का घडतात?” हे असे आहे कारण तुझ्या अनेक पापांमुळे तुझा घागरा उठला गेला आहे आणि तुझा बलात्कार झाला आहे.


“मी अशुद्ध नाही, मी बआल दैवताच्या मागे गेली नाही” असे तू मला कसे म्हणू शकतेस? तू दरीमध्ये केलेल्या वर्तनाकडे पाहा! तू काय केलेस त्याबद्दल विचार कर. एका जागेवरुन दुसऱ्या जागी धावणाऱ्या चपळ उंटिणीप्रमाणे तू आहेस.


या सर्व गोष्टी असूनही उलट तू म्हणतेस, “मी निरपराध आहे. खरोखर परमेश्वराचा क्रोध माझ्यावरून फिरला आहे.” पण पाहा, “मी पाप केले नाही” या अशा बोलण्यावरून तुझा न्याय होणार.


कारण हे त्यांच्या स्वतःचे नाहीत किंवा तुम्हास किंवा तुमच्या पूर्वजांना माहित नाहीत अशा दुसऱ्या देवांना धूप जाळून आणि त्यांची उपासना करण्यासाठी जाऊन वाईट गोष्टी करून त्यांनी माझे मन दुःखावले.


हे असे घडणार, जेव्हा तू, इस्राएल आणि यहूदा असे म्हणेल की, आपल्या परमेश्वर देवाने आम्हासोबत या सर्व गोष्टी का केल्या? तेव्हा यिर्मया तू त्यांना असे म्हण, ‘ज्याप्रकारे तुम्ही परमेश्वरास सोडून आपल्या देशात परक्या देवांची सेवा केली, त्याचप्रकारे जो राष्ट्र तुमचा नाही त्यामध्ये तुम्ही परक्यांची सेवा कराल.”


म्हणून मी यरूशलेम नगरी कचऱ्याचा ढीग करीन. ते कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”


एफ्राईम म्हणाला, “मी खरोखर धनवान झालो आहे, माझ्यासाठी संपत्ती मिळवली आहे. माझ्या सर्व कामात त्यांना अन्याय दिसला नाही, ज्यामध्ये माझ्यात पाप आढळते.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan