Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 15:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आईचे सात मुलांना जन्म देने वाया जाईल. असतील तरी ती सर्व मरतील. ती धापा टाकेल, दिवस असताही तीचा सूर्य मावळेल. ती लाजवली आणि शरमलेली केली जाईल, कारण मी तिच्यात उरलेले शत्रूंच्या तलवारीला सोपून देईन. परमेश्वर असे म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 सातपुती म्लान झाली आहे; ती प्राण सोडत आहे; भरदिवसा तिचा सूर्य मावळत आहे; ती लज्जित व फजीत होत आहे; त्यांचा अवशेष त्यांच्या वैर्‍यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन, असे परमेश्वर म्हणतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 सात मुलांची माता बेशुद्ध होऊन मृत्युमुखी पडेल. भरदिवसा तिचा सूर्य मावळेल; आता ती अपमानित आणि लज्जित होऊन बसेल. त्यातून वाचलेल्यांना त्यांच्या वैर्‍यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन,” याहवेहने असे जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 15:9
14 Iomraidhean Croise  

परंतु अपत्यहीनता व विधवापण या दोन्ही गोष्टी एका दिवशी एका क्षणात तुझ्यावर येतील; तुझे जादूटोणा आणि पुष्कळ मंत्रतंत्र व ताईत यांना न जुमानता तुजवर जोराने येतील.


येथेच मी यहूदातील व यरूशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्यांचा पाठलाग करणाऱ्यांच्या आणि त्यांचा शोध घेणाऱ्यांच्या हाती लागण्याआधी मी त्यांना तलवारीवर पाडून मारुन टाकीन. मग त्यांची प्रेते आकाशातील पक्षी व जंगली पशू ह्यांचे भक्ष्य होईल.


परमेश्वर असे म्हणतो, त्यानंतर, मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, त्याच्या अधिकाऱ्यांना, आणि जो कोणी मरीपासून, तलवारीपासून, दुष्काळापासून वाचला असेल, त्या सर्वांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, आणि जे त्यांचा जीव घेऊ पाहतात त्यांच्या स्वाधीन करीन.


पाहा, मी त्यांच्या चांगल्यासाठी नाही तर त्यांच्या अनिष्टासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. यहूदा देशातला जो प्रत्येक व्यक्ती मिसर देशामध्ये आहे त्यांचा अंत होईपर्यंत ते तलवारीने नाश होईल.


तरी तुमची आई अत्यंत लज्जित होईल. जी कोणी तुला जन्म देणारी तिला लाज वाटेल. पाहा, ती राष्ट्रांत क्षुद्र, रान, कोरडी भूमी आणि वाळवंट होईल.


“परमेश्वराच्या नावात तिच्यावर हल्ला करा. उठा! आपण दुपारी हल्ला करु. हे किती वाईट आहे की दिवस मावळत आहे आणि संध्याछाया लांबत आहेत.


परमेश्वर असे म्हणतो, ते मला राग आणतात काय? “ते स्वत:लाच संताप आणत आहेत. म्हणजे त्यांच्यावर लाज यावी.


यरूशलेम नगरी जी लोकांनी भरलेली असे, आता ती पूर्णपणे एकटी बसली आहे. जी राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होती पण ती विधवा झाली आहे. राष्ट्रांमध्ये जी राजकुमारी होती, पण आता तिला दासी केले गेले आहे.


दयाळू स्त्रीयांच्या हातांनी आपली मुले शिजविली, ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी ती त्यांचे अन्न झाली.


घातक साथीच्या रोगाने तुम्हातील तिसरा भाग तुमच्या संख्येतून मी नाहीसा करेन, तुम्हामध्ये भयंकर दुष्काळ भुकमरी, सभोवताली तलवारीने तुझे लोक नाश पावतील. सर्व दिशांनी तलवार येऊन तुझा पिच्छा करील.


तेव्हा राग पूर्ण होऊन समाधान पावेल, व माझा क्रोध शांत होईल असे त्यांना कळून येईल, परमेश्वर देव हे सर्व त्याच्या विरोधात आवेशाने म्हणाला.


जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत; आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत. वांझ होती तिने सात मुलांस जन्म दिला आहे, परंतु फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan