Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 15:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी समुद्रातील वाळूपेक्षा त्यांच्या विधवांची संख्या जास्त करीन. भर मध्यान्ही मी तरुणांच्या आईविरूद्ध विध्वंसक पाठवील. मी त्यांच्यावर धडकी आणि भये अकस्मात पाडील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 माझ्यासमोर त्यांच्या विधवा सागराच्या वाळूपेक्षा अधिक झाल्या आहेत; मी भरदुपारी त्यांच्यावर व तरुणांच्या मातेवर लुटारू आणतो; तिच्यावर क्लेश व त्रेधा ही अकस्मात ओढवतील असे मी करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी त्यांच्या विधवांची संख्या समुद्राच्या वाळूपेक्षा अगणित करेन. मी त्यांच्या तरुणांच्या आईविरुद्ध भर दुपारी मृत्यूचा विनाशक पाठवेन; अचानक त्यांच्यावर वेदना आणि क्लेश ओढवतील,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 15:8
15 Iomraidhean Croise  

तुझे पुरुष तलवारीने पडतील व वीर पुरुष युद्धात पाडले जातील.


यरूशलेमेच्या वेशी शोक व विलाप करतील; आणि ती एकटी असेल व जमिनीवर बसून राहील.


त्या दिवशी सात स्त्रिया एका पुरुषाला ताब्यात घेऊन म्हणतील आमचे स्वतःचेच अन्न आम्ही खाऊ, आमचे स्वतःचेच कपडे आम्ही घालू परंतु आमची लज्जा दूर करण्याकरिता आम्हास तुझे नाव घेऊ दे.


कारण या ठिकाणी जन्म घेणाऱ्या मुला आणि मुलींना आणि त्यांच्या आयांना ज्यांनी त्यांना जन्म दिला आणि त्यांचे बाप ज्यांमुळे ते या ठिकाणी जन्माला आले, त्यांना परमेश्वर असे म्हणतो,


यास्तव त्यांच्या मुलांना दुष्काळात सोड, आणि तलवार या कडे त्यांना सोपवून दे. त्यांच्या स्त्रिया वांझ आणि विधवा होवोत, आणि त्यांचे पुरुष मरणाने मारले जावोत, युद्धात तेथील तरुण मारले जावोत.


कारण मी तुझ्याविरूद्ध नाश करण्यास विध्वंसक पाठवायचे मी निवडले आहे. शस्त्रांसहित मनुष्ये, ते तुझे चांगले गंधसरु तोडून त्यांना अग्नीत पाडतील.


“राष्ट्रांना ह्याबद्दल विचार करण्यास लावा. पाहा! यरूशलेमेविरूद्ध घोषीत करा की, दूर देशातून वेढा घालणारे येत आहेत आणि यहूदाच्या विरूद्ध ते आपला शब्द उच्चारत आहेत.


म्हणून गर्द झाडीतून सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराविरूद्ध येईल. जो कोणी शहरातून बाहेर जाईल तो फाडण्यात येईल. कारण त्यांची पापे बहूतपट झालीत, आणि त्यांचे अविश्वासू कृत्ये फार झाली आहेत.


माझ्या लोकांच्या कन्ये, शोकवस्त्रे घाल आणि राखेत लोळ, एकुलता एक मुलगा गेल्याप्रमाणे आकांत कर. कारण नाश करणारा अगदी एकाएक आपल्यावर येईल.


आम्ही अनाथ झालो. आम्हास वडील नाहीत. आमच्या मातांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.


तुझ्यामध्ये असलेल्या संदेष्टयांच्या विरुध्द कारस्थान तुझ्यात आहे, जसा गर्जना करणारा सिंह आपल्या भक्षाला फाडून टाकतो, ते जीवन संपवून टाकतो आणि त्याने तिच्यात अनेकांना विधवा बनवले.


आणि तू दिवसा अडखळून पडशील आणि तुझासुद्धा भविष्यवादीही रात्री अडखळून पडेल; आणि मी तुझ्या आईचा नाश करेन.


खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोकांवर येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan