Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 15:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 म्हणून मी त्यांना देशाच्या दारात सुपाने पाखडणार आहे. मी त्यांना त्यांच्या मुलापासून वेगळे केले आहे, जर ते आपल्या मार्गातून फिरले नाहीत, तर मी माझ्या लोकांचा नाश करणार

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी त्यांना आपल्या देशाच्या वेशींवर सुपाने पाखडून टाकले, त्यांना अपत्यहीन केले; मी त्या लोकांचा विध्वंस केला, कारण ते आपल्या मार्गावरून मागे फिरले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मी शहरांच्या वेशींमध्येच त्यांना पाखडेन. मी विध्वंस आणि शोककळा माझ्या लोकांवर आणेन, कारण ते आपल्या वाईट मार्गापासून वळले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 15:7
21 Iomraidhean Croise  

परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात.


तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल; वावटळ त्यांना विखरील. आणि तू परमेश्वराच्या ठायी हर्ष करशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी तू उत्साह करशील.


पूर्वेकडून अराम्यांस व पश्चिमेकडून पलिष्टांस उघड्या तोंडाने ते इस्राएलास फस्त करतील, कारण त्याच्या क्रोधामुळे परमेश्वर थांबणार नाही, परंतु मारण्यासाठी त्याचा हात अजूनही उगारलेला राहील.


तरीही लोक ज्याने त्यांना फटका दिला त्या देवाकडे वळणार नाहीत, किंवा सेनाधीश परमेश्वराचा शोध घेणार नाहीत.


यास्तव त्यांच्या मुलांना दुष्काळात सोड, आणि तलवार या कडे त्यांना सोपवून दे. त्यांच्या स्त्रिया वांझ आणि विधवा होवोत, आणि त्यांचे पुरुष मरणाने मारले जावोत, युद्धात तेथील तरुण मारले जावोत.


हे परमेश्वरा, तुझे डोळे सत्याकडे पाहत नाहीत काय? तू लोकांस मारलेस पण त्यांना वेदना झाल्या नाहीत. तू त्यांना पूर्णपणे पराभूत केले, तरी त्यांनी शिक्षा घेण्याचे नकारले. त्यांनी आपले मुख खडकांपेक्षा कठीण केले आहे, कारण त्यांनी पश्चातप करण्याचे नकारले आहे.


मी बाबेलाकडे परदेशीय पाठवीन. ते तिला पाखडून काढतील आणि तिचा देश उध्वस्त करतील, कारण ते तिला अरिष्टाच्या दिवशी चहूकडून तिच्याविरूद्ध होतील.


कारण बाहेर असलेली मुले आणि चौकात तरुणांना नाहीसे करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून चढून आला आहे. तो आमच्या राजवाड्यांमध्ये शिरला आहे.


इस्राएलाच्या घराण्याला सांग, परमेश्वर देव असे सांगत आहे पाहा! घमंड तुझी ताकत झाली आहे तुझ्या डोळ्यांना जे बरे वाटते ते तुझ्या जीवाच्या वासनेने माझे पवित्रस्थान विटाळले आहे! आणि जी तुझी मुले व ज्या तुझ्या मुली मागे उरलेल्या होत्या त्या तलवारीने खाली पडल्या आहेत.


“पण तू मानवाच्या मुला, ज्या दिवशी त्यांच्यापासून त्यांचा आश्रय ताब्यात घेतला, जो त्यांचा आनंद, गर्व जो त्यांनी पाहिला व ज्याची इच्छा त्यांनी केली जेव्हा मी त्यांच्या मुलामुलींना त्यांच्या पासून घेऊन गेलो.


मी मनुष्ये, म्हणजे माझे इस्राएल लोक आणीन, ते तुमच्यावर चालतील असे मी करीन. ते तुझा ताबा घेतील आणि तू त्यांचे वतन होशील, आणि तू त्यांच्या मुलांच्या मरणाचे कारण होणार नाहीस.”


संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, “सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरितींपासून वळा!” परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय.


त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”


परमेश्वराच्या शापाने तुम्हास फार संतती होणार नाही, जमिनीत पीक चांगले येणार नाही, गुराढोरांचे खिल्लार फार वाढणार नाही. वासरे करडे शापित होतील.


तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसांमागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील पण ती सापडणार नाहीत, आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही.


तुम्हास मुले आणि मुली होतील पण ती तुम्हास लाभणार नाहीत. त्यांचे अपहरण होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan