Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 15:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मी तुझी संपत्ती आणि धन लूट असे देईन, ही तुमच्या सर्व पापांची किंमत असेल, जे तुम्ही आपल्या सिमांच्या आत केली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 “तुझ्या सर्व पातकांमुळे तुझ्या सर्व हद्दींतील तुझे वित्त व निधी मी मोबदला न घेता लूट म्हणून देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “मी तुमची संपत्ती व तुमचा ठेवा बेमोबदला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करेन, कारण तुम्ही केलेल्या सर्व पातकांमुळे संपूर्ण देशात असे घडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 15:13
8 Iomraidhean Croise  

तू तुझ्या लोकांस कवडीमोलाने विकलेस, आणि असे करून तू आपली संपत्ती देखील वाढवली नाही.


परमेश्वर म्हणतो, “तुम्ही फुकट विकले गेला होता, आणि तुमची मुक्तता पैशावाचून करण्यात आली आहे.”


परमेश्वर असे म्हणतो, काय घडले आहे ते आता पाहा माझ्या लोकांस फुकट नेण्यात आले आहे, तर आता माझे इथे काय काम आहे? जे त्यांच्यावर अधिकार चालवतात ते आक्रंदन करतील आणि पूर्ण दिवस माझ्या नावाची निंदा होत आहे.”


मी समुद्रातील वाळूपेक्षा त्यांच्या विधवांची संख्या जास्त करीन. भर मध्यान्ही मी तरुणांच्या आईविरूद्ध विध्वंसक पाठवील. मी त्यांच्यावर धडकी आणि भये अकस्मात पाडील.


विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्यांच्या वेद्या ते आठवतात. मी तुझी संपत्ती आणि विपुलता दुसऱ्यास लूट अशी वाटून देणार. कारण तुझी पातके तुझ्या सर्व सिमांत सरळीकडे आहेत.


मी त्यांना या नगराचे सर्व धन व त्याची सर्व मिळकत व त्याचे सर्व द्रव्ये देईन, म्हणजे यहूदाच्या राजांची सर्व द्रव्ये मी त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन. आणि ते ती लूटतील आणि ती घेऊन बाबेलास जातील.


“शबा आणि ददान आणि तार्शीशाचे व्यापारी, त्यांच्याबरोबरचे सर्व तरुण सिंह ते सर्व तुम्हास तुला म्हणतील, ‘तू लूट करायला आलास काय? सोने व चांदी, गुरेढोरे आणि मालमत्ता, चोरून लुटून नेण्यासाठी, मोठी लूट हस्तगत करण्यासाठी तू आपली सेना जमवली आहेस का?”


त्यांची संपत्ती लूट अशी होईल, आणि त्यांच्या घरांचा त्याग करण्यात येईल. ते घरे बांधतील पण त्या घरात राहणार नाहीत आणि ते द्राक्षमळे लावतील, पण त्यांना द्राक्षरस प्यायला मिळणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan