Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 13:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 कुशी लोक त्यांच्या कातडीचा रंग बदलू शकतील काय? किंवा चित्ता त्याच्यावरील ठिपके बदलू शकेल काय? त्याचप्रमाणे तुम्हास, जी नेहमीच वाईट करण्याची सवय आहे, ते तुम्ही चांगले करणार काय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 कूशी माणसाला आपली कातडी, चित्त्याला आपले ठिपके पालटता येतील काय? असे घडेल तरच दुष्टतेला सवकलेल्या तुम्हांला चांगले आचरण करता येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 कूशी मनुष्याला आपल्या त्वचेचा रंग बदलता येईल का चित्त्याला आपल्या शरीरावरील ठिपके बदलता येतील का? त्याचप्रमाणे तुला सत्कर्मे करता येत नाहीत दुष्कर्मे करण्याची तुला चटक लागली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 13:23
13 Iomraidhean Croise  

पण इस्राएल लोकांनी हे ऐकले नाही. ते पूर्वीप्रमाणेच वागत राहिले.


जरी तू मूर्खाला कुटलेल्या धान्याबरोबर उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याच्यापासून जाणार नाही.


जे वाकडे आहे ते सरळ करू शकत नाही! जे गमावले आहे ते जमेस धरू शकत नाही!


तुम्ही अजूनही का मार खाता? तुम्ही अधिकाधिक बंड का करता? तुमचे संपूर्ण मस्तक आजारी व संपूर्ण अंतःकरण कमकुवत आहे.


हृदय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त कपटी आहे, ते आजारी आहे, कोण त्यास समजू शकणार?


जरी तू स्वत:ला नदी मध्ये स्वच्छ केलेस किंवा खूप साबणाने आपणाला धूतले, तरी तुझ्या अपराधाचा डाग माझ्या समोर आहे,” असे सेनाधीश परमेश्वर देव म्हणतो.


“तुझ्या लोकांस मी शिक्षा केली ती व्यर्थ झाली आहे. त्यांनी शिस्त स्विकारली नाही, नाश करणाऱ्या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या भविष्यावाद्यांना खाऊन टाकले.”


कारण देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख लोक आहेत आणि त्यांना काहीएक समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण चांगले करायचे त्यांना ज्ञान नाही.”


हे परमेश्वरा, तुझे डोळे सत्याकडे पाहत नाहीत काय? तू लोकांस मारलेस पण त्यांना वेदना झाल्या नाहीत. तू त्यांना पूर्णपणे पराभूत केले, तरी त्यांनी शिक्षा घेण्याचे नकारले. त्यांनी आपले मुख खडकांपेक्षा कठीण केले आहे, कारण त्यांनी पश्चातप करण्याचे नकारले आहे.


प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याची थट्टा करतो आणि सत्य बोलत नाही. त्यांची जीभ खोटे बोलते. दुष्टाई करण्यासाठी ते आपणाला दमवतात.


मग हे शौलाला सांगितले असता, त्याने आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले. मग शौलाने तिसऱ्या वेळेस आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan