यिर्मया 13:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा तू कदाचित् स्वत:च्या मनास विचारशील, “माझ्या सोबतच या गोष्टी का घडतात?” हे असे आहे कारण तुझ्या अनेक पापांमुळे तुझा घागरा उठला गेला आहे आणि तुझा बलात्कार झाला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ‘हे माझ्यावर का आले?’ असे आपल्या मनात म्हणशील तर तुझ्या मनस्वी दुष्कर्मामुळे तुझ्या अंगावरील वस्त्राचा पदर सारला आहे व तुझ्या टाचा जबरीने उघड्या केल्या आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “हे सर्व माझ्यावर का ओढवले?” असा प्रश्न तू जर स्वतःला विचारलास— तर तुझ्या घोर पापांमुळे हे घडत आहे तुझी वस्त्रे फाडण्यात आली तुझ्या शरीरास दुष्टतेने वागविले आहे. Faic an caibideil |
हे असे घडणार, जेव्हा तू, इस्राएल आणि यहूदा असे म्हणेल की, आपल्या परमेश्वर देवाने आम्हासोबत या सर्व गोष्टी का केल्या? तेव्हा यिर्मया तू त्यांना असे म्हण, ‘ज्याप्रकारे तुम्ही परमेश्वरास सोडून आपल्या देशात परक्या देवांची सेवा केली, त्याचप्रकारे जो राष्ट्र तुमचा नाही त्यामध्ये तुम्ही परक्यांची सेवा कराल.”