Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 13:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग मी त्यांना एकमेकांवर आदळीन, पिता पुत्र एकमेकांवर आदळतील, मी त्यांचा नाश करू नये असा त्यांचा कळवळा मी करणार नाही, किंवा त्यांना सोडणार नाही, किंवा त्यांच्यावर दया करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 ते सर्व एकमेकांना विरोध करतील, आईपिता व मुलेदेखील एकमेकांना चिरडतील असे मी करेन, त्यांचा सर्वनाश होईल. मी त्यांची मुळीच गय करणार नाही व त्यांना दयामाया दाखविणार नाही, असे याहवेह जाहीर करतात.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 13:14
30 Iomraidhean Croise  

अम्मोनी आणि मवाबी लोक सेईर पर्वतातल्या लोकांशी लढू लागले. अम्मोन्यांनी आणि मवाब्यांनी त्यांचा पुरता संहार केला. सेईरातल्या लोकांचा बीमोड केल्यानंतर त्यांनी एकमेकांचा नाश केला.


तो वारा त्यास फेकून देईल आणि थांबणार नाही, तो त्याच्या हातातून निसटून जाण्याचा प्रयत्न करील.


लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील, कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील.


त्याच्या फांद्या सुकतील तेव्हा त्या तोडल्या जातील, स्त्रिया त्या सरपणासाठी वापरतील. कारण हे लोक समजदार नाहीत. म्हणून त्यांना घडविणारा देव ह्यास्तव यांच्यावर दया करणार नाही, आणि त्यांचा निर्माणकरता यांच्यावर कृपा दाखवणार नाही.


हे यरूशलेम, तुझ्यावर कोण दया करणार, आणि कोण दु:खाने तुझ्यासाठी आक्रोश करणार? तुझी विचारपूस करायला कोण वळणार?


तू मला नाकारलेस, परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यापासून मागे गेली आहेस. म्हणून मी माझ्या हाताने तुला फटकारील आणि नाश करीन. तुझ्यावर दया करून मी थकलो आहे.


कारण परमेश्वर असे म्हणतो, ज्या घरी शोक आहे, त्या घरात जाऊ नकोस. विलाप करायला आणि सहानुभूती दाखवायला त्या लोकांजवळ जाऊ नको. कारण या लोकांपासून मी आपली शांती व प्रेमदया व करुणा काढून नेल्या आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर असे म्हणतो, त्यानंतर, मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, त्याच्या अधिकाऱ्यांना, आणि जो कोणी मरीपासून, तलवारीपासून, दुष्काळापासून वाचला असेल, त्या सर्वांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, आणि जे त्यांचा जीव घेऊ पाहतात त्यांच्या स्वाधीन करीन.


कारण ते हा द्राक्षरस पितील आणि जी तलवार मी त्यांच्यामध्ये पाठवीन तिच्यामुळे ते मागेपुढे डोलतील व वेड्याप्रमाणे वागतील.”


त्यांच्या बलवान घोड्यांच्या टापांच्या आवाजामुळे, त्यांच्या रथांचा गडगडाट व त्यांच्या चाकांचा खडखडाट, आपल्या स्वतःच्या अशक्तपणामुळे वडील आपल्या मुलांना ते मदत करु शकणार नाहीत.


याकरीता परमेश्वर असे म्हणतो, “पाहा असे दिवस येत आहे की, मी त्याच्याकडे द्राक्षरस ओतणारे पाठवीन, तेव्हा ते त्यास ओतून टाकतील आणि त्याची पात्रे रिकामी करतील व त्यांचे बुधले तुकडे तुकडे करतील.”


यास्तव परमेश्वर असे म्हणतो: “मी या लोकांविरूद्ध अडखळणे ठेवीन. त्यावर वडील व मुले अडखळून पडतील. राहणारे आणि शेजारी हे नष्ट होतील.”


तरुण आणि वृध्द असे दोघेही रस्त्यात भूमीवर कसे पडले आहेत. माझे तरुण व तरुणी तलवारीने पडले आहेत; तू आपल्या क्रोधाच्या दिवशी त्यांच्यावर कसलिही दया केली नाही तर त्यांना निर्दयपणे मारलेस.


मी परमेश्वर देव असे जाहीर करतो हे असे घडेलच व ते मी करेलच, मी कडक धोरण सोडून देईन, तुझे मार्ग आणि तुझे कार्य हेच तुझा न्याय करतील; असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.


आता इस्राएल देशाचा शेवट जवळ आला आहे, यास्तव मी माझा क्रोध त्यांच्यावर प्रकट करेन, त्यांच्या अपवित्र कामा वरुन मी त्यांचा न्याय करेल. त्यानंतर त्यांच्यावर घृणा आणिन.


माझी दृष्टी तुमच्यावर दया करणार नाही, आणि मी तुमची गय करणार नाही, तुमच्या कामाचे वेतन तुम्हास देईन, तुमची घृणा मला येते, मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.


मी तुम्हाकडे करुणेने बघणार नाही, आणि तुझी गय मी करणार नाही, तुझ्या कामाची परतफेड तुझ्यावर होईल. तुम्हामध्ये घृणा वास करेल मग तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे. जो शिक्षा करणारा आहे.


म्हणून मीही त्यांच्या विरुध्द कार्य करेन, त्यांच्यावर मी कृपादृष्टी करणार नाही आणि त्यांची मी दाणादाण करणार आहे, ते माझ्या कानी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”


म्हणून मी त्यांच्यावर दया दृष्टी करणार नाही. त्यांची दया करणार नाही. त्यावर त्यांच्या कृत्यांचे फळ त्यांच्या माथी देईन.”


ऐकायला जाईल अशा अंतरावर मग तो बोलला शहरात त्यानंतर प्रवेश कर, व मारुन टाक, कुणावरही दया करु नकोस.


तिची मुले वेश्यावृत्तीमुळे असल्याने मी कसलीच दया त्यांच्यावर करणार नाही.


मला या देशात राहणाऱ्या लोकांबद्दल यापुढे दु:ख होणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो. “पाहा! मी त्यांना एकमेकांच्या व राजाचा तावडीत देईन; आणि याप्रकारे ते देशाचा नाश करतील व मी त्यांना त्यांच्या हातातून सोडविणार नाही.”


भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्यास विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांवर उठून त्यांना जिवे मारण्यास देतील.


भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांवर उठतील आणि ते त्यांना ठार करतील.


परमेश्वर अशा मनुष्यास क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर भयानक कोप होईल. या ग्रंथातील सर्व शाप त्यास लागतील, आणि परमेश्वर भुतलावरून त्याची नावनिशाणी पुसून टाकील.


तेव्हा बन्यामिनातील गिब्यांतल्या शौलाच्या पहारेकऱ्यांनी पाहिले की पलिष्टी सैन्याचा जमाव पांगत आहे आणि ते इकडे तिकडे पळत आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan