यिर्मया 13:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हे दुष्ट लोक जे माझे वचन ऐकण्यास नकार देतात, जे त्यांच्या हृदयाच्या कठोरपणात चालतात, जे दुसऱ्या देवाच्या मागे त्याची उपासना करण्यास आणि त्यांच्या समोर नमन करण्यास जातात, ते या कमरबंधाप्रमाणे होतील, ज्याचा काहीच उपयोग नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ते दुष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत, ते आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांना भजण्यास त्यांच्यामागे जातात म्हणून त्यांची गती ह्या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हे दुष्ट लोक, माझी वचने ऐकण्याचे नाकारतात, आणि स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टीपणाच्या मागे जातात आणि इतर दैवतांची सेवा व आराधना करतात, ते या कमरबंदाप्रमाणे होतील—पूर्णपणे निरुपयोगी! Faic an caibideil |
इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक, संदेष्टे पाठविले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठविले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगली कृत्ये करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करु नका. त्याऐवजी, तुमच्या पूर्वजांना व तुम्हास जो देश दिला आहे त्यामध्ये परत माघारी या. पण या लोकांनी माझे ऐकले नाही.