Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 नंतर परमेश्वर मला म्हणाला, “यहूदातील आणि यरूशलेममधील लोकांमध्ये कट सापडला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 परमेश्वर मला म्हणाला, “यहूदातील माणसे व यरुशलेमकर ह्यांनी केलेला कट उघडकीस आला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नंतर याहवेह मला म्हणाले, “यहूदीया व यरुशलेम येथील लोकांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:9
13 Iomraidhean Croise  

भविष्यवादी खोटेपणाने भविष्य सांगतात, आणि याजक त्यांच्या शक्तीने अधिकार गाजवतात. ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांस हे प्रिय आहे! पण शेवटी काय होणार?”


“कारण त्यांच्यातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ते सर्व अप्रामाणिक मिळकतीचा लोभ धरतात. भविष्यवाद्यांपासून ते याजकापर्यंत, त्यांच्यातील प्रत्येकजण फसवे काम करतो.


म्हणून मी त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते जे त्यांना ताब्यात घेतील त्यांना देईन. कारण लहानापासून तर मोठ्यांपर्यंत, सर्वजण अति लोभी आहेत. संदेष्ट्या पासून याजकापर्यंत, सर्वांनी फसवणूक केली आहे.


जशी लुटारुंची टोळी टपून बसते, तसा याजकांचा समूह आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात, त्यांनी महापातके केली आहेत.


तुझे अधिकारी लाच घेण्यासाठी न्याय करतात, आणि तिचे याजक मोबदल्यासाठी शिकवण देतात. आणि तुझे भविष्य बघणारे पैशासाठी भविष्य बघतात. तरीही ते परमेश्वरावर अवलंबून राहतात व म्हणतात, “परमेश्वर आम्हाबरोबर नाही काय? आम्हांवर अनिष्ट येणार नाही.”


यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्यास चांदीची तीस नाणी दिली.


यावरुन त्या दिवसापासून, त्यांनी त्यास जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan