Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही. ते दुराग्रही हृदयाचे बनले आणि आवडेल तेच त्यांनी केले. म्हणून मी त्यांना माझ्या आज्ञा पाळण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही, म्हणून करारात उल्लेखलेल्या सर्व शापित गोष्टी मला त्यांच्याबाबत कराव्या लागल्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 पण ते ऐकेनात, आपला कान लावीनात, तर आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालत गेले; मी त्यांना ह्या कराराची वचने पाळण्यास सांगितले असून त्यांनी ती पाळली नाहीत, म्हणून त्या करारात सांगितलेले सर्व मी त्यांच्यावर आणले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 परंतु त्यांनी ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट प्रत्येकजण आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने करीत राहिला. परंतु माझ्या ज्या आज्ञा पाळण्यास त्यांना सांगितले होते ते नाकारले म्हणून करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व श्राप मी त्यांच्यावर आणले.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:8
31 Iomraidhean Croise  

आणि मग त्यांनी आज्ञाभंग करून तुझ्याविरुध्द बंड केले. तुझ्या शिकवणीचा त्यांनी त्याग केला, ज्या संदेष्ट्यांनी तुझ्याकडे परत वळण्यासाठी सांगितले त्यांचा त्यांनी वध केला आणि त्यांनी तुझ्याविरूद्ध भयंकर दुराचरण केले.


त्यांनी पुन्हा तुझ्या नियमाकडे वळावे म्हणून तू त्यास बजावलेस. तरी हट्टीपणाने वागून त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले. जो कोणी तुझ्या आज्ञा पाळतो तो जिवंत राहतो. पण त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले. त्यांनी आज्ञापालन केले नाही, परंतु त्यांनी लक्ष दिले नाही व त्यांनी त्या ऐकण्याचेहि नाकारले.


हे दुष्ट लोक जे माझे वचन ऐकण्यास नकार देतात, जे त्यांच्या हृदयाच्या कठोरपणात चालतात, जे दुसऱ्या देवाच्या मागे त्याची उपासना करण्यास आणि त्यांच्या समोर नमन करण्यास जातात, ते या कमरबंधाप्रमाणे होतील, ज्याचा काहीच उपयोग नाही.


त्या वेळेला यरूशलेम बद्दल अशी घोषणा करतील, हे परमेश्वराचे सिंहासन आहे आणि परमेश्वराच्या नावाचा मान राखण्यासाठी सर्व राष्ट्रे यरूशलेममध्ये एकत्र येतील. या पुढे ते त्यांच्या दुराग्रही आणि दुष्ट मनांचे अनुसरण करणार नाहीत.


मी त्यांच्या वडीलांबरोबर मिसर देशातून बाहेर काढून आणण्यासाठी त्यांचा हात धरला तेव्हा जो करार केला होता त्याप्रमाणे हा असणार नाही. त्या दिवसात जरी मी त्यांच्यासाठी पती होतो तरी त्यांनी माझ्या कराराचा भंग केला.” असे परमेश्वर म्हणतो.


आणि त्यांनी प्रवेश केला आणि त्याचा ताबा घेतला. पण त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही किंवा तुझ्या नियमाचे आज्ञापालन केले नाही. त्यांना तू जे करण्याची आज्ञा दिली होती त्यांनी काहीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर ही सर्व संकटे आणली.


जो तुझा इब्री भाऊ तुला विकला होता त्यास तुम्ही प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी मुक्त करून सोडा, त्याने सहा वर्षे तुझी सेवा केली तेव्हा तू आपल्यापासून सुटका दे; परंतु तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही व लक्ष दिले नाही.


इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक, संदेष्टे पाठविले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठविले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगली कृत्ये करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करु नका. त्याऐवजी, तुमच्या पूर्वजांना व तुम्हास जो देश दिला आहे त्यामध्ये परत माघारी या. पण या लोकांनी माझे ऐकले नाही.


म्हणून परमेश्वर, सैन्यांचा देव आणि इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “पाहा, जे सर्व अरिष्ट मी त्यांच्याविरुद्ध आणणार म्हणून मी म्हणालो आहे, ते सर्व मी यहूदावर आणि यरूशलेमेच्या राहणाऱ्यांवर आणीन, कारण मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या पण त्यांनी उत्तर दिले नाही.”


यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला सांगत आहे तो परमेश्वराचा संदेश पाळ याकरिता की सर्व गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या होतील आणि तुझा जीवही वाचेल.


ते म्हणाले, “तू आम्हास परमेश्वराच्या नावात जे वचन सांगितले त्याच्याविषयी आम्ही तुझे ऐकणार नाही.


पण जसे आमचे पूर्वज, आमचे राजे व आमचे अधिकारी यहूदाच्या नगरांत आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर करीत असत, तसे आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळणे व तिला पेयार्पणे ओतण्याविषयी जो प्रत्येक शब्द आमच्या मूखातून निघाला आहे तो आम्ही खचित पूर्ण करू. कारण त्यावेळी आम्ही अन्नाने तृप्त होतो आणि कोणत्याही अनिष्टाचा अनुभव न घेता उन्नतीत होतो.


पण त्यांनी ऐकले नाही; त्यांनी दुसऱ्या देवाला धूप जाळणाऱ्या दुष्कृत्यापासून वळण्यास किंवा त्यांनी लक्ष देण्याचे नाकारले.


इस्राएलाच्या लोकांनो, तुम्हीही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” परमेश्वर असे म्हणतो! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हास बोलाविले, पण तुम्ही उत्तर दिले नाही.


पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते त्यांच्या दुष्ट अंतःकरणाच्या, त्यांच्या स्वतःच्या हट्टी योजनांनुसार जगले. म्हणून ते पुढे येण्याऐवजी मागे गेले.


पण त्यांनी माझे ऐकले नाही, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपली मान ताठ केली. ते त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक दुष्ट होते


तरीही त्यांनी माझा तिव्र विरोध केला आणि ते माझे ऐकेनात त्यातीत प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती, दैवत अशा तिरस्कार आणणाऱ्या वस्तू फेकून दिल्या नाही आणि म्हणून मी त्यांना त्वेषाने माझा क्रोध मिसरावर ओतीन, तरच मी समाधान पावेन, हा माझा केलेला ठराव आहे.


संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, “सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरितींपासून वळा!” परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय.


पण त्या लोकांनी ऐकण्याचे नाकारले व मान ताठ केली, देवाची वाणी ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी आपले कान झाकून घेतले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan