Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढून आणले, त्यावेळी मी त्यांना हा करार आज्ञापिला आणि ही वचने आचरनात आणा, तर तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडी भट्टीतून बाहेर काढले त्या दिवशी हा करार मी त्यांना आज्ञापिला व म्हटले, माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ‘इजिप्तच्या गुलामगिरीतून, लोखंडी भट्टीतून मी त्यांना सोडवून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना हे नियम सांगितले होते.’ मी म्हटले ‘माझ्या आज्ञा व मी जे सुचविले ते पालन करा, आणि मग तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा परमेश्वर होईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:4
39 Iomraidhean Croise  

ज्या प्रदेशामध्ये तू राहत आहेस तो, म्हणजे कनान देश, मी तुला व तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन, आणि मी तुमचा देव होईन.”


ते तुझे लोक आहेत हे आठव तू त्यांना मिसरमधून बाहेर आणलेस जसे काही लोखंड वितळविण्याचा तापलेल्या भट्टीतून बाहेर काढले हेच तुझे वतन होत.


तो परमेश्वरास धरून राहिला. त्यास अनुसरण्याचे त्याने सोडले नाही परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे त्याने पालन केले.


परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.


नेगेबमधल्या प्राण्यांविषयी घोषणा संदेश: आपले काही चांगले करता न येणाऱ्या लोकांकडे, संकटाच्या आणि धोक्याच्या प्रदेशातून, सिंहीण व सिंह, विषारी साप आणि आग्या उडता सर्प, ते आपले धन गाढवांच्या खांद्यावर व आपली संपत्ती उंटाच्या पाठीवर घालून नेतात.


पाहा! मी तुला गाळून पाहिले आहे, पण चांदी सारखे नाही, मी तुला संकटाच्या भट्टीत शुध्द केले आहे.


कारण मी त्यांना मिसरच्या बाहेर काढले त्या दिवसापासून या दिवसापर्यंत मी तुमच्या पूर्वजांना इशारा देत आलो आहे की माझा शब्द ऐका.


मला ओळखण्याचे हृदय मी त्यांना देईल, मग मी परमेश्वर आहे. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. ते सर्व अंत:करणापासून माझ्याकडे परत येतील.


तर आता तुम्ही आपली कर्मे आणि मार्ग व्यवस्थीत करा, आणि तुमचा परमेश्वर, तुमचा देव, याची वाणी ऐका, म्हणजे तो जे अरिष्ट तुम्हावर आणण्याचा बेत करीत आहे त्यामध्ये तो कदाचीत फेरविचार करीन.


मग तुम्ही लोक माझे व्हाल आणि मी तुमचा देव होईन.”


यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, हे नगर मी खास्द्यांच्या आणि बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देतो. तो हे काबीज करील.


यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला सांगत आहे तो परमेश्वराचा संदेश पाळ याकरिता की सर्व गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या होतील आणि तुझा जीवही वाचेल.


मग मी ठरवेन तसे ते चालतील, ते माझे फर्मान पाळतील आणि त्या प्रमाणे करतील. तर ते माझे लोक आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.


यासाठी इस्राएल घराणे माझ्यापासून परागंदा होणार नाही ते आपल्या पातकामुळे स्वतःला अशुद्ध करणार नाहीत, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन, असे परमेश्वर देव म्हणतो.


मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात रहाल. तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन.


मग ते यापुढे आपल्या स्वत:ला मूर्तीपुढे वा त्यांच्या तिरस्करणीय वस्तूंनी किंवा त्यांचे कोणतेही पापांनी आपणाला विटाळविणार नाहीत. त्यांनी ज्या आपल्या राहण्याच्या स्थानात पाप केले आहे त्या सर्वातून मी त्यांना तारीन व त्यांना शुद्ध करीन, यासाठी की, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.


माझे निवासस्थान त्यांच्यामध्ये राहील. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.


तेव्हा नबुखद्नेस्सराने धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ येऊन त्यांना हाक मारली “शद्रख, मेशख, अबेदनगो, सर्वोच्च देवाच्या दासांनो बाहेर या.” येथे या, नंतर शद्रख, मेशख, अबेदनगो अग्नीतून बाहेर आले.


मी तुमच्यामध्ये चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल.


तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या,


त्या तिसऱ्या भागाला मी अग्नीत टाकीन, आणि चांदीला शुद्ध करताता तसे त्यांना शुद्ध करीन; सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘हे माझे लोक आहेत.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव आहे.’”


दूरवर राहणारे लोक येतील आणि परमेश्वराचे मंदिर बांधतील मग तुमची खात्री पटेल की सेनाधीश परमेश्वरानेच मला तुमच्याकडे पाठवले आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक परमेश्वराची वाणी ऐकाल तर असे होईल.”


मी त्यांना घेऊन येईन आणि ते यरूशलेमेमध्ये राहतील. ते सत्याने व धर्माने पुन्हा माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.”


आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”


आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवास्थान आहात कारण देवाने म्हणले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’


आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा तुम्हास सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हास आशीर्वाद मिळेल.


पण तुम्हास परमेश्वराने मिसर देशाबाहेर आणले आणि तुम्हास स्वत:चे खास लोक केले. जणू लोखंड वितळविन्याच्या धधगत्या भट्टीतून त्याने तुम्हास बाहेर काढले आणि तुम्ही त्याच्या वतनाचे लोक आहा!


मिसर देशामध्ये तुम्ही गुलामीत होता तेथून मी तुम्हास बाहेर काढले, तो मी परमेश्वर, तुमचा देव आहे.


आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला


शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan