Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 त्यांच्यातील एकही मनुष्य शिल्लक राहणार नाही. कारण मी अनाथोथच्या लोकांवर वाईट, म्हणजे त्यांच्या शासनाचे वर्ष आणतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्यांतला कोणी शेष उरणार नाही, कारण अनाथोथ-करांवर मी अरिष्ट, त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आणतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 त्यांच्यातील एकही जिवंत राहणार नाही. कारण त्यांच्या शिक्षेचे वर्ष येताच मी अनाथोथच्या लोकांवर अरिष्ट आणेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:23
15 Iomraidhean Croise  

ते माझ्याविरूद्ध योजना आखत आहेत हे मला माहीत नव्हते. मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्यास जीवंताच्या देशातून तोडून टाकू म्हणजे त्याचे नाव आठवणीत राहणार नाही.”


यास्तव त्यांच्या मार्ग त्यांचा अंधारात निसरड्या मार्गा सारखा होईल. ते खाली ओढले जातील, ते त्यामध्ये पडतील. कारण त्यांच्या शिक्षेच्या वर्षी मी त्यांच्याविरुद्ध अरिष्ट पाठवीन, असे परमेश्वर म्हणतो.


पाहा, मी त्यांच्या चांगल्यासाठी नाही तर त्यांच्या अनिष्टासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. यहूदा देशातला जो प्रत्येक व्यक्ती मिसर देशामध्ये आहे त्यांचा अंत होईपर्यंत ते तलवारीने नाश होईल.


तिचे भाडोत्री सैनिक तिच्यामध्ये गोठ्यातल्या वासराप्रमाणे आहेत, पण ते सुद्धा पाठ फिरवून व दूर पळून जातील. ते एकत्रित उभे राहत नाहीत, कारण त्यांच्या विपत्तीचा दिवस, त्यांच्या शिक्षेचा समय त्यांच्या विरोधात आला आहे.


जो कोणी दहशतीने घाबरुन पळेल तो खाचेत पडेल, आणि जो कोणी खाचेतून वर येतो तो सापळ्यात सापडेल, कारण मी हे त्याच्याविरुध्द म्हणजे मवाबावर त्याचे शासन घेण्याचे वर्ष आणिन.” असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर असे म्हणतो, या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा नाही करावी का? “अशा राष्ट्रांवर मी माझा सूड नाही उगवणार का?


तेव्हा मी त्यांना शिक्षा नाही करावी काय? असे परमेश्वर म्हणतो, असल्या राष्ट्रांविषयी माझ्या अंत: करणात सूड उमटू नये का?


तिचे सर्व बैल मारून टाका. त्यांना खाली कत्तलीच्या जागी पाठवा. त्यांना हाय हाय, कारण त्यांचे दिवस आले आहेत, कारण त्यांच्या शिक्षेची वेळ आली आहे.


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “ते इस्राएलाचे शेष उरलेल्या द्राक्षांसारखे वेचून काढतील, तू आपला हात द्राक्षे खुडणाऱ्याप्रमाणे डाहाळ्यातून फिरव.”


त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली का? नाही त्यांना लाज वाटली नाही. म्हणून पडणाऱ्यांना शिक्षा होत असता ते पण त्यांच्याबरोबर पडतील, असे परमेश्वर म्हणतो.


शासन करण्याचे दिवस येत आहेत, प्रतिफळाचे दिवस येत आहेत, इस्राएल हे जाणणार, तुझ्या महापातकामुळे, वैरभावामुळे आता संदेष्टा मूर्ख बनला आहे.


याकोबाचे घराणे अग्नी होईल, आणि योसेफाचे घराणे जाळ होईल, आणि एसावाचे घराणे भूस होईल, आणि ते त्यांच्यात पेट घेऊन त्यास खाऊन टाकतील. एसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही. कारण परमेश्वर असे बोलला आहे.


त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडुपाप्रमाणे आहे. त्यातला अति सरळ तो काटेरी कुंपणापेक्षा वाईट आहे. हा दिवस, तुझ्या पाहारेकऱ्यांचा दिवस येतो, आता त्यांचा गोंधळ उडेल.


ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan