यिर्मया 11:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 ते माझ्याविरूद्ध योजना आखत आहेत हे मला माहीत नव्हते. मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्यास जीवंताच्या देशातून तोडून टाकू म्हणजे त्याचे नाव आठवणीत राहणार नाही.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मी तर सौम्य कोकरासारखा होतो; नकळत ते मला वधण्यास नेत होते. “ह्या झाडाचा आपण फळासकट नाश करू व त्याच्या नावाचे स्मरण पुन्हा होऊ नये म्हणून त्याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू,” असा त्यांचा माझ्याविरुद्ध कट चालला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 कत्तलखान्याकडे चालविलेल्या अज्ञान कोकरासारखा मी भोळाभाबडा होतो; मलाच ठार मारण्याचा त्यांचा बेत होता याची मला जाणीवही नव्हती, ते म्हणाले, “झाडाचा त्याच्या फळांसहित नाश करू या; याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू या, म्हणजे याची नावनिशाणीही राहणार नाही.” Faic an caibideil |