यिर्मया 11:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 “माझ्या प्रिय लोकांनी, ज्यांनी इतके दुष्ट हेतू धरले आहेत, ते माझ्या घरात का आहेत? कारण तुझ्या अर्पणाचे मांस तुझा बचाव करु शकणार नाही, कारण तू वाईट केले आणि नंतर आनंद केला.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 माझ्याशी कपटाने वागणार्या माझ्या प्रियेचे माझ्या मंदिरात काय काम? नवसांनी व पवित्र मांस अर्पण केल्याने तुझ्यावरचे संकट टळेल काय? टळत असेल तर आनंद कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “माझी प्रिया माझ्या मंदिरात काय करीत आहे? इतरांसह मिळून ती तिच्या दुष्ट कारस्थानाची योजना करीत आहे का? तुमच्या अर्पणाचे शुद्धीकरण करून तुमची शिक्षा परतवू शकाल का? जेव्हा तुम्ही तुमच्या दुष्ट योजना पार पाडण्यात व्यस्त राहता, तेव्हा तुम्ही आनंदित होता.” Faic an caibideil |
परमेश्वर असे म्हणत आहे, ज्यावरून मी तुझ्या आईबरोबर घटस्फोट घेतला त्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र कोठे आहे? आणि ज्याच्याकडे मी तुम्हास विकले तो सावकार कोठे आहे? पाहा, तुम्हास विकले कारण तुमच्या पापामुळे आणि तुमच्या बंडखोरीमुळे, तुमच्या आईला दूर पाठविण्यात आले. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हास देऊन टाकले. तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले,