Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 यहूदातील शहरे व यरूशलेममधील रहिवासी ज्यांना ते अर्पणे देत असत, आणि धूप जाळीत असत, असे ते त्यांच्या देवांकडे आरोळी करतील, पण त्या भयंकर संकटकाळी लोकांस मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 यहूदाची नगरे व यरुशलेमकर ज्या दैवतांना धूप जाळतात त्यांच्याकडे जाऊन ते आरोळी मारतील; पण संकटसमयी ती त्यांचे रक्षण मुळीच करणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 यहूदीयातील नगर आणि यरुशलेममधील लोकांनी ज्या अन्य देवतांसमोर धूप जाळला, ते त्यांचा धावा करतील, परंतु त्यांना ते आपत्तीतून सोडवू शकणार नाही. निराशेच्या आपत्तीतून त्यांना सोडवू शकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:12
10 Iomraidhean Croise  

या संकटकाळात आहाजच्या वाईट वर्तनात आणखी भरच पडली. तो परमेश्वरापासून दुरावला.


जे तुम्ही राष्ट्रातून निभावलेले शरणार्थी ते तुम्ही एकत्र जमा व्हा व या. जे कोरीव मूर्तीची लाकडे वाहून नेतात आणि ज्या देवाला तारण करता येत नाही त्याची प्रार्थना करतात त्यांना काही ज्ञान नाही.


ते आपल्या खांद्यांवर उचलून घेतात आणि वाहून नेतात; तो नेऊन त्याच्या जागी ठेवतात आणि तो त्याच्या जागेवर उभा राहतो व त्या जागेतून हालत नाही. ते त्यास आरोळी मारतात, पण तो त्यांना उत्तर देत नाही किंवा कोणालाही त्याच्या संकटातून वाचवत नाही.


पण माझे लोक मला विसरले आहेत, ते कवडी मोलाच्या मूर्तींना वस्तू अर्पण करतात आणि आपल्या मार्गात अडखळणे करतात. त्यांनी पूर्वजांच्या जुन्या वाटा सोडून ते आडवळणाने चालतात.


तर तुम्ही स्वत:साठी घडविलेले देव कोठे आहेत? संकट समयी तुम्हास सोडावयास त्या समर्थ असतील तर त्यांनी उठून यावे. कारण हे यहूदा, तुझ्या शहरांइतक्या तुझ्या मूर्त्या आहेत!


कारण तुम्ही जेथे राहण्यास गेला आहात त्या मिसर देशात दुसऱ्या देवाला धूप जाळून तुमच्या हातच्या कृत्यांनी मूर्तीपूजा करुन तुम्ही मला दुःखवता. तुम्ही तेथे जात आहात याकरिता की तुमचा नाश व्हावा आणि शापीत व्हावे व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमध्ये तुमची निंदा व्हावी.


परमेश्वर म्हणेल, कोठे आहेत ते खोटे देव? तुम्ही आश्रयासाठी ज्याच्याकडे धाव घेतलीत तो कुठे आहे तुमचा दुर्ग?


ते खोटे दैवत तुमच्या यज्ञातील चरबी खाणारे, तुम्ही अर्पण केलेल्यातील द्राक्षरस प्राशन करणारे दैवत कोठे आहेत? तेव्हा त्या दैवतांनीच उठून यावे व तुम्हास साहाय्य करावे!


जा, आणि ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्यास हाक मारा; तुमच्या संकटाच्या वेळेस त्याने तुम्हाला सोडवावे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan