Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 10:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तुला कोण भिणार नाही, हे राष्ट्राच्या राजा? कारण तू त्या योग्यतेचा आहेस, कारण राष्ट्रांच्या सर्व ज्ञान्यांमध्ये आणि त्यांच्या सर्व राज्यांमध्ये तुझ्यासारखा कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते; राष्ट्रांतील सर्व ज्ञात्यांत, त्यांच्या सर्व राज्यांत तुझ्यासमान कोणीच नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे भय नाही असा कोण आहे? अशा श्रद्धेच्या योग्य केवळ तुम्हीच आहात, सर्व राष्ट्रातील सुज्ञ पुढाऱ्यांमध्ये आणि जगातील सर्व राज्यांमध्ये तुमच्यासारखे दुसरे कोणीच नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 10:7
28 Iomraidhean Croise  

फक्त परमेश्वर देवालाच भजा. तरच तो तुम्हास सर्व संकटातून सोडवील.”


परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. आणि सर्व दैवतांपेक्षा त्याचेच भय धरणे योग्य आहे.


तेव्हा काळ जाणणाऱ्या सुज्ञ मनुष्यांना राजाने म्हटले, कारण कायदा आणि न्याय जाणणारे अशा सर्वांच्यासंबंधी सल्ला घ्यायची राजाची प्रथा होती.


आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही.


कारण राज्य परमेश्वरचे आहे, तो जगावर अधिकार करणारा आहे.


तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.


खरोखर, सर्व राजे त्याच्यापुढे नमन करोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत;


तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील?


हे प्रभू, देवांमध्ये तुझ्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाही. तुझ्या कृत्यासारखी कोणीतीही कृत्ये नाहीत.


हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील. ते तुझ्या नावाला आदर देतील.


कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे? देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे?


फारोने उत्तर दिले, “उद्या.” तेव्हा मोशे म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल अशा प्रकारे तुम्हास समजेल की आमच्या परमेश्वरासारखा कोणीच देव नाही.


कारण या वेळेस मी आपल्या सर्व पीडा तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर पाठवीन म्हणजे सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी देव नाही, हे यावरुन तुला कळेल.


तो राष्ट्रांमध्ये न्याय करील व अनेक लोकांबद्दल निर्णय देईल, ते आपल्या तलवारी मोडून त्याचे फाळ बनवतील व आपल्या भाल्यांचे कोयते करतील, यानंतर राष्ट्र राष्ट्रांवर तलवार उगारणार नाही किंवा युद्धकला सुद्धा अवगत करणार नाही.


परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस आणि तुझ्या नावातच सामर्थ्य आहे.


परमेश्वर म्हणतो, तुम्ही भीत नाही काय? किंवा माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापत नाही काय? मी सनातन नियमाने समुद्राच्याविरूद्ध वाळूची सीमा घातली आहे, जेणेकरून त्याने उल्लंघन करू नये. जरी समुद्र उठतो आणि खाली पडतो, तरी त्याच्याने उल्लंघवत नाही. जरी त्याच्या लाटा गर्जतात, तरी त्या ओलांडून जात नाही.


दानीएलाने राजास उत्तर दिले, “राजाचे गुढ प्रकट करण्याची कुशलता, ज्ञानी, व भुतविद्या जाणणारे, जादूगार किंवा ज्योतिषी त्यांच्याकडे नाही.


तथापी, एक देव आहे जो स्वर्गात राहतो तो रहस्य प्रगट करतो आणि त्याने भविष्यात होणारी घटना राजा नबुखद्नेस्सर आपणास कळविली आहे. तुम्ही आपल्या बिछान्यात पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टांत तो असा.


परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली, आणि मी भयभीत झालो. हे परमेश्वर, तू आपले कार्य या समयामध्ये पुनर्जीवित कर; या समयामध्ये ते माहित करून दे. तुझ्या क्रोधात आमच्यावर दया करण्याची आठवण ठेव.


त्यानंतर त्या दिवसात पुष्कळ राष्ट्रे परमेश्वराकडे येऊन त्यास मिळतील. तो म्हणतो, “तेव्हा तुम्ही माझी प्रजा व्हाल; कारण मी तुम्हामध्ये वस्ती करीन.” आणि मग तुला समजेल की मला तुझ्याकडे सेनाधीश परमेश्वराने पाठवले आहे.


“कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर होईल; प्रत्येक ठिकाणी सर्व माझ्या नावाला धूप अर्पितील व शूद्ध अर्पण करतील. कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये महान होईल.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सांगतो. तुम्हास ठार मारल्या यानंतर तुम्हास नरकात टाकून देण्यास ज्याला अधिकार आहे, त्याची भीती धरा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा.


परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्वकाही निर्माण झाले आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याच्या द्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्या द्वारे आपण जगतो.


ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व लोक जाणतील आणि तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे निरंतर भय बाळगाल.”


मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील.


हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही? कारण तू एकच पवित्र आहेस; कारण सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan