Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 10:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 बातमीचा अहवाल आला आहे, पाहा! यहूदातील शहरांचा नाश करायला आणि कोल्ह्यांची वस्ती करायला. उत्तरेतून मोठा भूमीकंप येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ऐका! अवई ऐका! पाहा, ती येत आहे, उत्तरदेशातून मोठी गर्दी येत आहे. ती यहूदाची नगरे वैराण, कोल्ह्यांची राहण्याची जागा अशी करून सोडील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 ऐका! तो अहवाल येत आहे— उत्तरेकडून एक महाभयंकर ध्वनी ऐकू येत आहे! तो यहूदीयाची नगरे निर्जन करेल, तिथे कोल्हे भटकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 10:22
16 Iomraidhean Croise  

तिच्या महालात काटेरी झाडे वाढतील, आणि तिच्या किल्ल्यात खाजकुईलीची झाडे व काट्यांची झाडे उगवतील. ती कोल्ह्यांचे वस्तीस्थान, शहामृगाचे अंगण होईल.


परमेश्वर मला म्हणाला, “देशातील राहणाऱ्या सर्वांवर उत्तरेकडून आपत्तीचा वर्षाव होईल,


कारण परमेश्वर म्हणतो, मी उत्तरेकडील राज्यातील सर्व कुळांना बोलावीन आणि ते येतील, ते प्रत्येक आपापले राजासन यरूशलेमेच्या वेशींच्या प्रवेशाजवळ आणि सभोवती त्याच्या सर्व कोटांच्या समोर व यहूदाच्या सर्व नगरांच्या समोर स्थापन करतील.


तरुण सिंहांनी त्याच्याविरुध्द डरकाळ्या फोडल्या आहेत. त्यांनी मोठा आवाज केला आहे आणि त्यांनी त्याची भूमी भयानक अशी केली आहे. त्याच्या शहरांचा नाश झाला आहे, त्यामध्ये कोणी रहिवाशी नाही.


म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, या देशाविरूद्ध आणि त्यातील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध, तुझ्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध बोलावून घेईन. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी त्यांना नाश करण्यासाठी ठेवीण. आणि त्यांना विस्मय व फूत्कार व सर्व काळ ओसाड असे करीन.


कारण बातमीचा आवाज दान शहरातून येत आहे आणि एफ्राईमाच्या पर्वतांवरून येणारी विपत्ती ऐकू येत आहे.


खुण म्हणून ध्वज उभारा व तो सियोनेच्या दिशेने दाखवा आणि सुरक्षिततेसाठी पळा. थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट व भयानक विध्वंस आणीत आहे.


“हासोर कोल्ह्यांची वस्ती होईल, कायमचे ओसाड होईल. तेथे कोणीही राहणार नाही. कोणी मनुष्यप्राणी तेथे राहणार नाही.”


पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, मी दूरुन एक राष्ट्र आणतो, ते शक्तीशाली राष्ट्र आहे. ते प्राचीन राष्ट्र आहे. त्या राष्ट्रांतील भाषा तुला माहीत नाहीत. किंवा ते काय बोलतात ते तू समजू शकणार नाही.


बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरूशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका. बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.


परमेश्वर पुढे असे म्हणतो: “उत्तरेकडून लोक येत आहे. पृथ्वीवरच्या अतीदूरच्या ठिकाणाहून मोठे राष्ट्र येत आहे.


म्हणून मी यरूशलेम नगरी कचऱ्याचा ढीग करीन. ते कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”


सियोनेचे मार्ग शोक करतात, कारण नेमलेल्या पवित्र सणाला कोणीही येत नाही. तिच्या सर्व वेशी ओसाड झाल्या आहेत व तिचे याजक कण्हत आहेत. तिच्या कुमारी दु:खात आहेत, व ती स्वत: निराशेत आहेत.


मग त्या भूमीतील लोकांस सांग, प्रभू परमेश्वर हे यरूशलेम रहिवाशासंबंधी सांगतोय; इस्राएल निवासी तुम्ही आपली भाकर थरथर कापत खाल व पाणी प्याल आजपावोत तुमची भूमी लुटली जाईल कारण जे त्या ठिकाणी राहतात, त्यांच्या हिंसेमुळे हे घडेल.


आणि मी एसावचा स्वीकार केला नाही. मी त्याच्या डोंगरी प्रदेशांचा नाश केला. एसावच्या देशाचा नाश झाला, आता तिथे फक्त रानटी कोल्हे राहतात.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan