Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 10:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पण देव, याकोबाचा वाटा, त्यांसारखा नाही, कारण तो सर्व गोष्टी घडवणारा आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 जो याकोबाचा वाटा तो त्यांसारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे व इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, इस्राएलसहित, ते लोक त्यांचे वारस आहेत; सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 10:16
28 Iomraidhean Croise  

परमेश्वर माझा वाटा आहे; तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे.


कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे.


हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस, जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस.


परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.


माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत, पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य आहे.


तू प्राचीनकाळी जी मंडळी विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडविले तिचे, व ज्या सीयोन पर्वतावर तू वस्ती केली त्याची आठवण कर.


म्हणून मी आता तुम्हास सांगतो की तुम्ही माझी वाणी खरोखर ऐकाल आणि माझ्या कराराचे पालन कराल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे.


मग तो म्हणाला, “हे प्रभू, तुझी कृपादृष्टी जर माझ्यावर झाली असेल तर तू आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत हे मला माहीत आहे; तरी आमचा अन्याय व पाप यांची तू आम्हांला क्षमा कर आणि आपले वतन म्हणून आमचा स्वीकार कर.”


परमेश्वराने सर्वकाही त्याच्या उद्देशासाठी बनवलेले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे.


सेनाधीश परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. मिसर माझे लोक व अश्शूर माझ्या हातचे कृत्य व इस्राएल माझे वतन आशीर्वादीत असो.


मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले; मी शांती आणतो आणि अनर्थ उत्पन्न करतो; मी परमेश्वर आहे, जो ह्यासर्व गोष्टी करतो.


“आमचा उद्धारक, त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे.”


मी माझ्या लोकांवर रागावलो होतो; मी माझे वतन अशुद्ध केले आहे आणि मी ते तुझ्या हातात दिले आहे, पण तू त्यांना दया दाखवली नाही; तू वृद्धांवर फार जड ओझे ठेवले आहे.


“कारण मी, परमेश्वर तुमचा देव आहे, जो समुद्र घुसळतो अशासाठी की त्यांच्या लाटांनी गर्जना करण्यात.” सेनाधीश परमेश्वर हेच त्याचे नाव आहे.


कारण तुझा निर्माता तुझा पती आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे. इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारक आहे; त्यास सर्व पृथ्वीचा देव असे म्हटले जाईल.


ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने जग निर्माण केले आपल्या समंजसपणाच्या आधारे आकाश पांघरले.


परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस आणि तुझ्या नावातच सामर्थ्य आहे.


परमेश्वर असे म्हणतो, जो परमेश्वर दिवसा प्रकाशण्यासाठी सूर्य देतो आणि रात्री चंद्र व तारे यांना प्रकाशण्याची तजवीज करतो. जो समुद्रास खवळतो या करीता त्याच्या लाटा गर्जतात त्यांना तो शांत करतो. सेनाधीश परमेश्वर असे त्याचे नाव आहे. तो असे म्हणतो.


परमेश्वर, तू हजारोंना विश्वासाचा करार दाखवतो व मनुष्यांचे अन्याय त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांच्या पदरी ओततो. तू थोर व सामर्थ्यवान देव आहेस. सेनाधीश परमेश्वर तुझे नाव आहे.


परमेश्वर जो हे करतो, परमेश्वर जो हे स्थापित करण्यासाठी योजितो, परमेश्वर हे त्याचे नाव आहे, तो असे म्हणतो,


ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे, तो राजेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसा डोंगरामध्ये ताबोर व जसा समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे तसा कोणीएक येईल.


त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे; ‘सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे’ तो खचित त्यांचा वाद चालवील, म्हणजे मग तो देशास विसावा देईल व बाबेलाच्या रहाणाऱ्यावर संघर्ष आणील.”


पण देव, याकोबाचा हिस्सा, त्यासारखा नाही, कारण तो सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे.


माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.”


कारण पाहा, जो पर्वत निर्माण करतो व वारा अस्तित्वांत आणतो, आणि मनुष्यास त्याची कल्पना काय ती प्रगट करतो, जो पाहाटे अंधार करतो, आणि पृथ्वीच्या उंच स्थानांवर चालतो. त्याचे नाव परमेश्वर, सेनाधीश देव आहे.”


स्वत:ची पवित्र नगरी म्हणून परमेश्वर यरूशलेमची फेरनिवड करील यहूदा म्हणजे परमेश्वराच्या पवित्र भूमीचा वाटा असेल.


परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होत. याकोब हाच त्याच्या वतनाचा वाटा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan