Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 1:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 “मी तुला आईच्या उदरात घडवण्यापूर्वीच, मी तुला निवडले आहे, आणि तू गर्भातून निघण्याआधीच मी तुला पवित्र केले आहे. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा असे केले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 “मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “मी तुला गर्भाशयात घडविण्याच्या पूर्वीपासून ओळखतो, तुझा जन्म होण्यापूर्वीच मी तुला समर्पित केले आहे; आणि राष्ट्रांकरिता माझा संदेष्टा म्हणून तुझी नेमणूक केली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 1:5
26 Iomraidhean Croise  

मी गुप्तस्थळी निर्माण होत असता, आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.


तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते.


मोशे परमेश्वरास म्हणाला, “पाहा या लोकांस घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तीशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.”


ज्याने तुला निर्माण केले आणि गर्भस्थानापासून तुला घडिले, जो तुझे साहाय्य करतो तो परमेश्वर असे म्हणतो, हे याकोबा, माझ्या सेवका, आणि यशुरुना, ज्या तुला मी निवडले आहे तो तू भिऊ नको.


अहो द्विपांनो, माझे ऐका! आणि दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनो, लक्ष द्या. माझ्या आईने मला जगात आणले असताच, मी जन्मताच परमेश्वराने मला बोलावले आहे.


आणि आता, तो परमेश्वर म्हणतो, ज्याने मला त्याचा सेवक व्हावा म्हणून जन्मापासून घडवले आहे, ह्यासाठी की याकोबाला त्याच्याजवळ परत आणावे, मी परमेश्वराच्या दृष्टीत सन्मान पावलो आहे, आणि माझा देव माझे बळ झाले आहे.


खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी, नष्ट करून टाकण्यासाठी, आणि उलथून टाकण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी, आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे.”


परमेश्वराचे वचन माझ्याजवळ आले,


तुम्हास मुलगा झाला, असे बोलून माझ्या जन्माची बातमी माझ्या वडिलांना देऊन त्यांना आनंदी करणारा मनुष्य शापित असो,


आणि त्या देशाविरूद्ध जी काही वचने मी बोललो, म्हणजे जे काही या पुस्तकात लिहीले आहे, जे सगळ्या राष्ट्रांविषयी यिर्मयाने भविष्य सांगितले ते मी त्यांच्यावर आणीन.


तू आपणासाठी गुंडाळी घे आणि यहूदा, इस्राएल आणि इतर राष्ट्रे यांच्याविषयी मी तुला सांगितलेले सर्व वचने त्यावर लिही. योशीयाच्या दिवसापासून आतापर्यंत मी तुला सांगितलेली प्रत्येकगोष्ट लिही.


त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे; ‘सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे’ तो खचित त्यांचा वाद चालवील, म्हणजे मग तो देशास विसावा देईल व बाबेलाच्या रहाणाऱ्यावर संघर्ष आणील.”


कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.


जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली.


हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरीता तू त्यांच्यापुढे चालशील.


तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले, त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही ‘दुर्भाषण करता’ असे तुम्ही मला म्हणता काय?


प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;


कारण त्यास ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.


पण कोणी देवावर प्रीती करीत असेल तर त्या मनुष्यास देव ओळखतो.


देवाने सर्वकाही ख्रिस्ताच्या पायाखाली केले आणि त्यास सर्वांवर मंडळीचे मस्तक म्हणून दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan