Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 1:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तसेच यहूदाचा राजा योशीया ह्याचा मुलगा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या दिवसात, आणि यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या समाप्तीपर्यंत, पाचव्या महिन्यात, जेव्हा यरूशलेमधील लोकांस पाडाव करून नेले तोपर्यंत ते त्याच्याकडे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तसेच यहूदाचा राजा योशीयापुत्र यहोयाकीम ह्याच्या काळापासून यहूदाचा राजा योशीयापुत्र सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे पाचव्या महिन्यात यरुशलेमकरांना बंदिवान करून नेले तेथवर ते वचन आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र यहोयाकीम, याच्या राजवटीपासून आणि यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याच्या राजवटीच्या अकराव्या वर्षाच्या पाचवा महिना संपला, जेव्हा यरुशलेममधील लोक बंदिवान करून नेण्यात आले तेव्हा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 1:3
19 Iomraidhean Croise  

फारो-नखोने योशीयाचा मुलगा एल्याकीम याला राजा केले एल्याकीम गादीवर आला. एल्याकीमचे नाव फारो-नखोने बदलून यहोयाकीम केले; आणि यहोआहाजाला मिसरला नेले. यहोआहाज तेथे मरण पावला.


बाबेलाच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनाचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.


योशीयाचे पुत्र थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चौथा शल्लूम.


परमेश्वराचे वचन माझ्याजवळ आले,


परमेश्वरापासून यिर्मयाकडे वचन आले. नबुखद्नेस्सर बाबेलाचा राजा व त्याचे सर्व सैन्य व त्याच्या सत्तेखाली असलेली पृथ्वीवरील सर्व राज्ये व सर्व लोक यरूशलेमेशी व त्याच्या सर्व नगरांशी लढत होते तेव्हा हे वचन आले. ते या प्रमाणे,


यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या दिवसात यिर्मयाला परमेश्वराकडून वचन आले ते हे आहे. ते म्हणाले,


तू आपणासाठी गुंडाळी घे आणि यहूदा, इस्राएल आणि इतर राष्ट्रे यांच्याविषयी मी तुला सांगितलेले सर्व वचने त्यावर लिही. योशीयाच्या दिवसापासून आतापर्यंत मी तुला सांगितलेली प्रत्येकगोष्ट लिही.


सिद्कीयाच्या अकराव्या वर्षाच्या आणि चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरूशलेमेच्या तटबंदीला भगदाड पडले.


“याजकांना आणि या देशातील इतर लोकांस सांग की तुम्ही सत्तर वर्षे प्रत्येक वर्षांच्या पाचव्या आणि सातव्या महिन्यात उपवास केला व शोक प्रकट केला. पण हा उपवास खरोखरच माझ्यासाठी होता का?


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्ही चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्याच्या विशिष्ट दिवशी शोक प्रकट करता, उपवास करता. ते यहूदाच्या घराण्यास छान, आनंदाचे, मोठ्या चांगुलपणाचे दिवस होतील. म्हणून तुम्ही सत्य आणि शांती ह्यावर प्रेम केलेच पाहिजे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan